Breaking News

आश्रम शाळेत शिकणार्‍या मुलींची सुरक्षा वाढवा; आ. नीलम गोर्‍हे यांची विधान परिषदेत मागणी


मुंबई : राज्यातील निवासी शाळेतील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्‍न नीलम गोर्‍हे यांनी विधानपरिषदेत उपस्थित केला. मुलींच्या निवासी शाळेवर महिला अधिक्षिकांची नेमणे, विशाखा समितीचा कार्यविस्तार वाढविणे अशी मागणी केली आहे.

वाळवा तालुक्यातील आश्रम शाळेत शिकणार्‍या मुलींवर संस्थाचालकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली होती. या मुद्द्यावरुन नीलम गोर्‍हे यांनी निवासी शाळेत शिकणार्‍या मुलींच्या सुरक्षेबाबत प्रश्‍न उपस्थित केली. वाळवा आश्रमशाळेतील लैंगिक अत्याचारप्रकरणी निलंबित शिक्षक हे सही करण्यासाठी शाळेत जातात. अनेक शाळांवर विशाख्या समित्या नेमण्यात आल्या नाहीत. तिथे महिला सुरक्षा समिती नेमावी. यामध्ये महिला पोलीस अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व महिला वकिलांचा समावेश करावा.
अनेक भटक्या-विमुक्त, गतिमंत, आदिवासींच्या शाळामध्ये मुलींवरील लैंगिक अत्याचाराचे प्रमाण वाढत आहेत. मात्र शाळांना माहिती मिळत नसल्याने ती वेबसाईटवर मिळावी, अशी त्यांनी मागणी केली. अनेक पीडित मुलींचे पालक दबावाखाली आहेत. मुलींचे शिक्षण होण्यासाठी पालकांचे समुपदेश असणे आवश्यक आहे. वाळवा प्रकरणातदिरंगाई करणार्‍या समाजकल्याण अधिकार्‍याला सहआरोपी करा, अशीही निर्मला गोर्‍हे यांनी मागणी केली.

प्रमुख मागण्या

निवासी शाळेतील वर्गात सीसीटीव्ही बसवावेत, तक्रारपेटी असावी, पोक्सो कायद्याची माहिती द्यावी, अशी मागणी गोर्‍हे यांनी केली. आमदार विद्या ठाकूर यांनी लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलीस तडजोडीची भाषा करतात, यावर गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी मागणी केली. त्यांनी विशाखा समिती कागदोपत्री असल्याचा आरोप केला.

लैंगिक अत्याचारप्रकरणी पोलीस तडजोडीची भाषा करतात, असा आरोप आमदार विद्या ठाकूर यांनी केला. त्यावर गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी उत्तर द्यावे अशी मागणी केली. त्यांनी विशाखा समिती कागदोपत्री असल्याचा आरोप केला.