Breaking News

बुलडाणा लोकसभा काँगे्रस लढणार काँगे्रस जिल्हा कार्यकारणीच्या बैठकीत घेतला ठराव


चिखली,(प्रतिनिधी): होऊ घातलेल्या 2019 मधील लोकसभा निवडणुकीत मित्र पक्षा बरोबर आघाडी झाली तरी बुलडाणा लोकसभेची जागा काँगे्रस पक्षालाच मिळावी आणि काँगे्रसच्या उमेदारानेच ही जागा लढावी, असा महत्वपुर्ण ठराव बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला. 6 नोव्हेंबर रोजी माळीभवन येथे जिल्हा अध्यक्ष आमदार राहुल बोन्द्रे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कार्यकारणीची बैठक संपन्न झाली.

या बैठकीसाठी जिल्हयातील प्रदेश सरचिटणीस श्याम उमाळकर, संजय राठोड, माजी आ. दिलीपकुमार सानंदा, लक्ष्मणराव घुमरे, डॉ.अरविंद कोलते, मनोज कांयदे, साहेबराव मोरे, मो.वसिमोद्यीन, शेैलेश खेडकर, दयाराम वानखेडे, दिपक देशमाने, यांचेसह सर्व जिल्हा कार्यकरणी पदाधिकारी, सर्व ब्लॉक काँगे्रसचे अध्यक्ष, फ्रटलचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र प्रदेश काँगे्रस कमिटीच्या वतीने मोदी व फडणवीस सरकारच्या विरोधात त्यांच्या विश्‍वास घातकी, जुलमी भ्रष्ट कारभारा विराधात राज्यातील गोरगरीब शेतकरी, शेत मजुर, विद्यार्थी, महिला कामगार व मध्यम छोटे व्यवसायीक अशा सर्व स्तरातील नागरीकांचा असंतोष संघटीत करून सर्वव्यापी संघर्ष करण्यासाठी जनसंघर्ष यात्रा काढण्यात आलेली आहे. या यात्रेचे आगमन या महिन्यात बुलडाणा जिल्हयात होत आहे. त्याचबरोबर राज्यभर जनसंपर्क अभियान काँगे्रस पक्षातर्फे राबविल्या जाते आहे. या पार्श्‍वभूमीवर विचार विनिमय आणि तयारी करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत जनसंघर्ष यात्रेचे जोरदार स्वागत करून जिल्हयात मेहकर चिखली, सिंदखेड राजा, खामगांव, मोताळा व शेगांव येथे जाहीर सभांचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर जनसंपर्क अभियाना अंतर्गत गावोगाव या यात्रेतील विचार पोहचविण्यासाठी नियोजन करण्यात आले असून ब्लॉक स्तरावर हे अभियान प्रभावीरीत्या राबविण्यासाठी समन्वय समित्यांची नियुक्ती केल्या गेली आहे. या शिवाय बुलडाणा जिल्हयातील काँगे्रस कार्यकर्त्यांना प्रशिक्षीत करण्यासाठी विधानसभा क्षेत्र निहाय प्रशिक्षण शिबीराचे आयोजन काँगे्रस कडून करण्यात येणार असून या प्रशिक्षण शिबीरासाठी जिल्हा प्रभारी सुनिल सपकाळ व समन्वयक अभयसिंग मारोडे, बुलडाणा विधानसभा सन्वयक इरफान पठाण, चिखली विधानसभा डॉ.सत्येंद्र भुसारी, खामगांव श्रीकृष्ण धोटे, मलकापुर श्रीरीष डोरले, मेहकर विनोद पर्‍हाड, सिंदखेड राजा सुनिल जायभाये, जळगांव जामोद राजेंद्र वानखेडे, यांची नियुक्ती करण्यात आली आहे.