Breaking News

शेतकरी संघटनेने कर्ज बूडवणार्‍या शेतकर्‍यांचा केला जाहीर सत्कार


कडा (प्रतिनिधी) भवानीनगर ईंदापूर येथे टॉंपटेन शेतीकर्ज बुडवणार्‍या शेतकर्‍यांचा सत्कार रघूनाथ दादा पाटील यांच्या उपस्थितीत मा.कालीदास अपेट यांच्याहस्ते सन्मानचिन्ह देवून जाहीर सत्कार करून कर कर्जा नही देंगे ओर बीजलीका बील भी नहीं देंगे या आंदोलनाची नांदी शेतकरी संघटनेने दिली.या कर्जदारात टँक्टर, पाईपलाईन, शेतीकर्ज, शेतीपूरक कर्जांचा समावेश आहे.हे कर्ज राष्ट्रकृत बँका, से़वासहकारी सोसायट्या, पतसंस्था, ई.चे होते.ते कर्ज या शेतकर्‍यांनी कायदेशीर मार्गाने बूडवले आहे. या द्वारे शेतकरीसंघटनेचे रघूनाथदादा पाटील आव्हाण केले आहे कि शेतकर्‍यांनी कूठल्याही प्रकारचे कर्ज व विजबील भरु नये जेथे बँका , पतसंस्था व विजकंपनी त्रास देत असतीलतर संघटनेशी संपर्क साधावा रघूनाथदादा पाटील शेतकर्‍यांच्या पाठीशी सदैव राहतील.शेतकरी कर्जमूक्त व शेतीमा लाला रास्तभाव मिळवल्या शिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही.या शेतकरी पंचायतचे आयोजन शिवाजीनाना नांदखीले, पांडूरंग रायते व पूणेजिल्हा शेतकरी संघटनेने केले होते. या कार्यक्रमास बीड जिल्ह्यातून सूशिलाताई मोराळे,शेख अजिमोद्दीन, भिमा झगडे,शाबानखॉं पठाण,ऊध्दव विधाते,रहेमान सय्यद ,रिजवान बेग व शिवलींग यादव हे उपस्थित होते.