Breaking News

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत युवतीवर बलात्कार


लग्नाचे आमिष देत बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. या युवतीने लग्नाची मागणी केली असता तिला वेळोवेळी जातिवाचक शिवीगाळ करत आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी पीडित युवतीने केलेल्या तक्रारीनुसार संशयित तरुणाच्या विरोधात बलात्कार आणि अनुसूचित जाती-जमाती कायद्यांतर्गत मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दरम्यान, संशयित तरुणाच्या अाईने उपनगर पाेलिसात संबंधित युवती व एका तरुणावर १५ लाख रुपये न दिल्यास बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी फिर्याद दिली असून पाेलिसांनी याप्रकरणी दाेघांवर गुन्हा दाखल केला अाहे.