सुश्रूत हॉस्पीटलमध्ये राष्ट्रीय आयुर्वेद दिवस साजरा


बुलडाणा,(प्रतिनिधी) आरोग्य सेवेत काम करतांना बदलत्या समाजाचे आयाम जोपासतांना त्यातील सेवाभाव जपणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. ते आयुर्वेद दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. नॅशनल ईटिग्रेटेड असोसिएसनच्या वतीने राष्ट्रीय आयुर्वे दिवसाच्या निमीत्ताने सुश्रुत हॉस्पीटलच्या सभागृहात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते धन्वतरी पुजन व दिप प्रज्वलन करण्यात आले. अध्यक्षस्थानी डॉ. एम. आर. पर्‍हाड हे होते. प्रमुख पाहुणे म्हणुन आमदार हर्षवर्धन सपकाळ यांचेसह डॉ. एल.के राठोड, डॉ.राजेंद्र वाघ, जेष्ठ धन्वंतरी डॉ बाहेती, डॉ. विप्लव चव्हाण, डॉ. सुप्रिया वाघमारे, डॉ. प्रविण भाले, डॉ. रविंद्र राठोड, डॉ. शरद काळे, डॉ. कमर खान, गजानन शिंदे, राजेंद्र काळे, अरुण जैन यांची उपस्थिती होती. याप्रसंगी बोलतांना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की सध्याच्या काळात सर्वचजण आपल्या आरोग्याप्रति सजक राहतात ही चांगली बाब आहे. आरोग्य सेवेत काम करतांना बदलत्या समाजाचे आयाम जोपासतांना त्यातील सेवाभाव जपणे आवश्यक आहे.


धन्वंतरी दिनापासुन दिवाळी सुरुवात होत असतांना माणसा माणसांच्या मनातील अंधारही दुर करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. आयुर्वेद उपचार पध्दती एक चांगली पॅथी आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. एम आर पर्‍हाड यांनी आपल्या मनोगतात सांगीतले कि, योग आणि आयुर्वेदाचा खुप जवळचा संबध आहे. योग आता जगभर पोचला आहे. आयुर्वेदाचा प्रचार प्रसारही आता सगळ्या जगात होत आहे ही आयुर्वेदाचा अभ्यास करणारांसाठी आनंदाची बाब आहे. कार्यक्रमचे प्रास्ताविक डॉ. राजेश्‍वर उबरहंडे यांनी केले. सुत्रसंचालन डॉ. माधवी जवरे यांनी केले. डॉ श्रुती टाकळकर यांनी धन्वतरी स्तवन सादर केले. या कार्यक्रमासाठी डॉ. गजानन पडघान,डॉ.वैशाली पडघान, डॉ.अमित बामरटकर, डॉ. सोपान खर्चे डॉ अशोक उचाडे,डॉ चंद्रकिरण पवार, डॉ रविंद्र वाघमारे, डॉ प्रविण पिंपरकर. यांनी पुढाकार घेतला होता. आयुर्वेद दिवसानिमीत्त आयोजित या कार्यक्रमासाठी शहरातील आयुर्वेदाचार्याची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. -

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget