विविध मागण्यांंसाठी तहसीलदारांना निवेदन :श्रमिक कामगार युनियन


शेवगाव/प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील श्रमिक राज कामगार युनियनच्या वतीने रोजगार हमी कायद्याअंतर्गत मागेल त्याला काम तालुक्यामध्ये होत असलेला बंद करून सुरळीत वीजपुरवठा करावा गाव गाव होत असलेला पाणीपुरवठा स्वच्छ पिण्याचे पाणी माणसांसह जनावरांना उपलब्ध करून द्या. 

परा शालेय विद्यार्थ्यांची फी माफ करा स्वस्त धान्य दुकानांतून मिळणार्‍या धान्याचा कोटा वाढवा गॅसधारकाला किमान एक लिटर रॉकेल द्या. बँकांकडून शेतकर्‍यांची होत असलेली कर्ज वसुली थांबवा रोजगार हमीचे काम मिळेपर्यंत तालुक्यातील बेरोजगारांना भत्ता चालू करावा, गॅस सिलेंडरचे भाव कमी करा, शेतकर्‍याची संपूर्ण कर्जमाफी करा. यासह विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आली आहे अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष प्रथमेश सोनवणे यांनी या वेळी निघालेल्या विशाल काय मोर्चाचे नेतृत्व केले व निवेदनाची प्रत शेवगावचे तहसीलदार विनोद भामरे यांना देण्यात आले. यावेळी शासनाचा निषेध करून शासन विरोधी घोषणाही देण्यात आल्या, शासनाचा निषेध करून घेण्यात आलेल्या जाहीर सभेत संजीवनी गायकवाड, पुष्पा नेमाने हौसाबाई मस्के रुक्मिणी नेमाने यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या मोर्चाला शेवगाव पोलिसांच्या वतीने मोठा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget