Breaking News

निसरे फाटा येथे टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार ठार


मल्हारपेठ (प्रतिनिधी) : कराड-चिपळूण या नवीन बांधण्यात येणार्‍या महामार्गावर पाटण तालुक्यातील निसरे विहीर नजीक एका दुचाकीस्वाराला पाठीमागून भरघाव वेगाने आलेल्या 407 टेम्पो (एमएच 10 - 5913) ने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार मधुकर आत्माराम पवार (वय 45 रा नावडी वसाहत, वेताळवाडी) हे जागीच ठार झाले. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, शुक्रवारी सायंकाळी साडे सहाच्या दरम्यान मधुकर आत्माराम पवार हे कराड-चिपळूण महामार्गावरून दुचाकीने कराडला निघाले होते. यादरम्यान, पाटणहून सांगलीकडे निघालेल्या 407 टेंपोने पाठीमागून त्याच्या दुचाकला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार मधुकर पवार हे जागीच ठार झाले. तसेच टेम्पो चालक शामराव सरगर (रा. सांगली) याने अपघातानंतर पोबारा केला. घटनास्थळी असलेल्या लोकांनी टेम्पोचा नंबर कराड पोलिसांना कळविल्याने अपघातग्रस्त टेम्पोसह शामराव सरगर यास पोलिसांनी ताब्यात घेतले. मयत मधुकर पवार हे पाटण येथील खरेदी-विक्री संघात काम करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि मुलगी असा परिवार आहे.