सरकार सूडबुद्धीने वागत आहे : विखे पाटील


मुंबई : सरकार विरोधकांशी सूडबुद्धीने वागत आहे. विरोधकांना दडपण्याचे काम करत आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. अजित पवार यांच्या सिंचन घोटाळा प्रकरणाविषयी ते बोलत होते. यावेळी त्यांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने बोलणे योग्य होणार नाही असेही सांगितले. विधानभवनाच्या बाहेर विरोधीपक्षातील आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. मराठा आरक्षण, शेती प्रश्‍न आदी मुद्यावर सरकारला धारेवर धरण्यात आले. सरसेनापती संताजी घोरपडे स्मारकाला निधी द्यावा, चंदगड ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा देण्यात यावा, तर्थक्षेत्रांना निधी द्यावा या मागण्या करत राष्ट्रवादीच्या आमदारांनी सभागृहाच्या पायर्‍यावर घोषणाबाजी केली. यावेळी हसन मुश्रीफ, वंदना चव्हाण, सत्यजित तांबे आदी उपस्थित होते.

लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने नागपूर खंडपिठासमोर शपथपत्र सादर केले आहे. यात अजित पवार हेच सिंचन घोटाळ्यासाठी जबाबदार असल्याचे सांगितले आहे. यावर बोलताना विखे पाटील म्हणाले की, हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे यावर बोलणे योग्य होणार नाही. पण, यातून सरकार विरोधकांना दडपण्याचा प्रयत्न करत आहे असे दिसते. अशी प्रकरणे अधिवेशन काळातच बाहेर का येतात, असा सवालही त्यांनी विचारला. मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षणाचा प्रश्‍न भिजत पडला आहे. यावरुन लक्ष विचलीत करण्यासाठीच हे प्रकरण पुढे आल्याचे विखे पाटील म्हणाले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget