आखतवाडे सभामंडपाचे भूमिपूजन


शेवगाव/प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील आखतवाडे येथे श्री हनुमान मंदिरासमोर आ. मोनिका ताई राजळे यांच्या स्थानिक विकास निधीतून सुमारे 10 लाख रूपये खर्चून सभामंडप मंजुर करण्यात आला त्याचे भूमिपूजन दि 31 रोजी करण्यात आले यावेळी बापूसाहेब पाटेकर, कचरू चोथे, गणेश कराड, बापूसाहेब भोसले, बशीर शेख, आत्माराम फुंडकर, सागडे, सोपान वडणे, संदीप वाणी, वाय. डी. कोल्हे, दिनकर गर्जे, बाळासाहेब सोनावणे, तापडीया महाराज, पवार महाराज, भागवत महाराज उगले यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते 

या वेळी बोलताना राजळे ताई म्हणाल्या, गावांमधे आरोग्य सेवा, रस्ते, पाणी आहे परंतु सभामंडप नव्हता म्हणून हा सभामंडप देण्यात आला, सध्या भयानक दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे नुकताच नगर येथे बैठक झाली आहे. यामध्ये शेतकर्‍यांच्या अडचणी, विद्यार्थी फिस, जनावरांना चारा पाणी यासाठी काही ना काही निधी मिळेल असही त्या म्हणाल्या, दुष्काळाच्या ज्या उपाय योजना करायच्या त्या सुरू झाल्या आहेत. विरोध उगीचच मोर्चे काढून लोकांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत, शेवगाव व पाथर्डी मधे सुमारे 55-60 टंँकर सध्या पाणी पुरवठा करत आहेत जी परिस्थिती फेब्रुवारी-मार्च मध्ये होते ती ऑक्टोबर मध्ये झाली दुष्काळ जन्म परिस्थितीत सामना करण्यासाठी संयम हवा, जर मार्च काढून, उपोषण करून,आंदोलन करून प्रश्‍न सुटत असेल तर हे चुकीचे आहे यावेळी रवि राशिनकर, आप्पासाहेब पुडेंकर, संजय उगले, मंगल उगले, काका गाढे, बापूराव राशिनकर, संतोष झावरे, संपत उगले, गणेश साळवे, अशोक उगले, राजेंद्र सोनावणे, दिगंबर पवार, ज्ञानेश्‍वर उगले, यांच्या सह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget