भादोला येथे ग्रंथ प्रवरणा दिन संपन्न


 बुलडाणा,(प्रतिनिधी)ः येथून जवळच असलेल्या भादोला येथे तीन महिन्यापासुन सुरु असलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत बुध्द आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन पूर्ण करुन 30 ऑक्टोंबर रोजी भारतीय बौध्द महासभेच्या वतिने ग्रंथ प्रवरणा दिन संपन्न झाला. 

यावेळी भारतीय बौध्द महासभेची महिला शाखा गठीत करण्यात आली असून राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न अशोकराव आंबेडकर यांच्या आदेशावरुन गाव तीथे शाखा निर्माण करुन प्रत्येक गावात ग्रंथ वाचन करुन प्रवरणा दिन कार्यक्रमाचे आयोजन करुन बौध्द बांधवांना भारतीय बौध्द महासभेच्या 10 उदीष्टाप्रती जागृत करणे, समाजातील एकतेला बळकटी देऊन भारतीय बौध्द महासभेचे रितसर संघटन बांधनी करुन आणि संस्थेचे कार्य समाजाला पटवून द्यावे या संदर्भाने भादोला येथे भारतीय महासभेच्या व विशाखा महिला संघाच्या वतिने कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला राज्य संपर्क प्रमुख आंबादास घेवंदे उपस्थित होते. तसेच सामाजिक कार्यकर्ते राम हिवाळे, धम्म उपासिका छायाताई लक्ष्मण जाधव येळगाव, प्रा. धम्मरत्न वायवळ, जिल्हा संघटक संजय हिवाळे, जिल्हा संपर्क प्रमुख रणजित जाधव, विठ्ठल जाधव, रामदास घेवंदे, सुरेश घेवंदे यांची उपस्थिती होती. आंबादास घेवंदे व अनंता मिसाळ यांनी आपले विचार व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या भारतीय बौध्द महासभेचे कार्य समजून घ्यावे व धम्म दिक्षा प्रमाणपत्र मिळऊन जगामध्ये बौध्द असल्याची ओळख निर्माण करावी. संस्थेच्या कार्यप्रणालीवर विश्‍वास ठेऊन संस्थेस समाजाने तनमनधनाने सहकार्य करुन संरथेचे कार्य वाढविण्यास मदत करावी असे आवाहन करण्यात आले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget