Breaking News

दुष्काळाचे गांभीर्य ओळखून वाढदिवसाला फाटा देत जनावरांना चारा वाटप


अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असताना जनावरांच्या चार्‍याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. याची जाणीव ठेवत कृपाल मेहेत्रे यांनी आपल्या वाढदिवसाच्या वायफट खर्चाला फाटा देत महाकाल प्रतिष्ठान, अप्पा ग्रुप व त्रिमुर्ती मित्र मंडळाच्या वतीने अरुणोदय गो शाळेत चारा वाटप केले. यावेळी गजेंद्र भांडवलकर, गहिनीनाथ दरेकर, निलेश हिंगे, अनिरुद्ध भोर, चेतन अग्रवाल, अनंत बोरुडे, प्रसन्न बिडकर, शिवदास वाडेकर, सनी शिंदे, पवन कुमटकर, रोहित रोकडे, स्वप्नील गोडसे, शंतनू धनेशवट, अमोल शिंदे, राहुल तारळकर, कुमार गिरवले, निलेश शिंदे आदींसह प्रतिष्ठानचे युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

अनिरुद्ध भोर म्हणाले की, सध्या जिल्ह्यासह महाराष्ट्रात भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकर्‍यांपुढे जनावरे जगाविणे गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. शासकीय मदत यायला उशीर असला तरी कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून जनावरांसाठी चारा उपलब्ध करुन देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. गो शाळेचे मनिष फुलडहाळे यांनी दुष्काळी परिस्थिती असल्याने जनावरांच्या चार्‍याचा प्रश्‍न निर्माण होत आहे. गो शाळेत जनावरांची संख्या दिवसंदिवस वाढत असून, वाढदिवस, सण, उत्सव निमित्त गो शाळेस चारा वाटप करण्याचे त्यांनी आवाहन केले.