Breaking News

वाढदिवसानिमित्त आमदार पाचर्णे यांचा महागणपतीला सपत्नीक अभिषेकशिरूर (प्रतिनिधी) - शिरूर-हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे यांनी वाढदिवसानिमित्त महागणपतीला सपत्नीक अभिषेक व पूजा करुन गणरायाचे दर्शन घेतले. याप्रसंगी रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने देवस्थानचे सचिव प्रा. नारायण पाचूंदकर यांच्या हस्ते आमदार बाबुराव पाचर्णे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. 

याप्रसंगी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक निवृत्ती अण्णा गवारे, देवस्थानचे सचिव प्रा. नारायण पाचूंदकर देवस्थान ट्रस्टचे व्यवस्थापक बाळासाहेब गोरे, सेवा निवृत्त पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब पाचूंदकर,उद्योजक राजेश लांडे, घोडगंगेचे माजी संचालक कैलास सोनवणे,संदीप ढमढेरे, संभाजी ढमढेरे, बाळासाहेब चव्हाण आदींसह स्थानिक नागरिक व अनेक उपस्थित होते.


रांजणगाव गणपती येथे शिरूर-हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे यांनी वाढदिवसाच्या दिवशी पहाटे महागणपतीला सपत्नीक अभिषेक व पूजा करुन गणरायाचे दर्शन घेतल्यानंतरच आपल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचा स्वीकार करणे ही गेल्या अनेक वर्षांपासूनची परंपरा कायम ठेवली.