Breaking News

पंतप्रधान पिक विम्याचा लाभ शेतकर्‍यांना तात्काळ मिळावा - बामदळेभाविनिमगाव/प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील फळ उत्पादक शेतकर्‍यांनी जून 2018 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत विमा कंपन्यांकडे बँकेमार्फत विमा रक्कम भरलेली आहे. यामध्ये मोसंबी, संत्रा उत्पादक शेतकर्‍यांचा समावेश आहे.मात्र 15 जून ते 15 ऑगस्ट या कालावधीत पावसाच्या खंडाने दुष्काळी परिस्थिती ओढावल्यामुळे शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे. परिस्थिती नुसार 15 ऑगस्टनंतर 45 दिवसात शेतकर्‍यांना मोबदला देणे विमा कंपन्यांना बंधनकारक असून तो आजपर्यंत मिळालेला नाही.


तरी शेतकर्‍यांना दुष्काळी परिस्थितीत त्वरित न्याय मिळावा अन्यथा आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी रास्तारोको आंदोलन छेडतील असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे. अशी माहिती शेवगाव तालुकाध्यक्ष संदीप बामदळे यांनी दिली. शेवगाव तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनावर फळबाग शेतकर्‍यांच्या सह्या आहेत.