Breaking News

समाजातील वंचित घटकांना न्याय देण्यास प्रयत्नशील राहुः शेख


राहुरी/प्रतिनिधी
समाजातील वंचित घटकांना न्याय देण्यासाठी प्रयत्नशील राहून सामाजाच्या व्यथा शासनदरबारी मांडून संघटनेच्या माध्यमातून कार्यरत राहताना समाजाला न्याय देण्यासाठी सर्वांना सोबत घेवून झटणार असे प्रतिपादन सय्यद बाबा शेख यांनी केले. भारतीय मुस्लिम देवस्थान ईनाम जमिन बचाव कृ ती समिती महाराष्ट्र राज्य आयोजित जिल्हा कार्यकारीणी निवड बैठक राहुरीत आयोजित करण्यात आली होती अध्यक्षस्थानी राज्य उपाध्यक्ष मुज्जूभाई पठाण होते, राज्यसचिव सादिकभाई पठाण,राज्यसंघटक रज्जाकभाई सय्यद, राज्यकार्याध्यक्ष ड.गंगाधर तुवर,रासपाचे उत्तर जिल्हाध्यक्ष शरदराव बाचक र,युवा जिल्हाध्यक्ष नाना जुंधारे विद्यार्थी संघटना अध्यक्ष नानासाहेब कोळपे आदी प्रमुख उपस्थित होते.

भारतीय मुस्लिम देवस्थान ईनाम जमिन बचाव कृती समितीच्या अहमदनगर जिल्हा कार्यकारीणीवर कोपरगाव तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते सय्यद बाबा शेख यांची त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत जिल्हाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली तसेच राहुरी तालुका कार्यकारणीही प्रसंगी नियुक्त करण्यात आली असून राहुरी तालुकाध्यक्षपदी इमरान शेख, उपाध्यक्षपदी अजिजभाई ईनामदार, सय्यद राजू अहमद, महिला तालुकाध्यक्षपदी अंजूम हारुण शेख, सचिव अन्वरभाई सय्यद, शहराध्यक्ष रफिक मुतालिक शेख, आदींची नियुक्ती होत उपस्थित मान्यवर यांचे हस्ते नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आले, याप्रसंगी शरदराव बाचकर यांनी नुतन पदा धिकारी यांना शुभेच्छा व्यक्त करत संघटनेच्या कार्यासाठी केव्हाही हाक द्या मदत करु असे आश्‍वासित केले. सुत्रसंचलन राज्यसंघटक रज्जाकभाई सय्यद यांनी तर शेवटी आभारप्रदर्शन मुज्जूभाई पठाण यांनी केले.