बनावट अकृषक प्रकरणी मंत्र्यांच्या दालनात बैठक


चिखली,(प्रतिनिधी): चिखलीच्या बनावट अकृषक आदेश प्रकरणात आ. राहुल बोंद्रे यांनी विधानसभेत लक्षवेधी व्दारे विचारलेल्या प्रश्‍नावर  महसूल मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या दालनात संबंधीत अधिकार्‍यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.

या बैठकीला आ. राहुल बोंद्रे यांच्या सोबत महसूल सहसचिव क्षीरसागर, महसूल उपसचिव अजित देशमुख, महसूल अव्वर सचिव पाडळे, बुलडाणा उपविभागीय अधिकारी श्रीमती गोनेवार, चिखली तहसीलदार मनीष गायकवाड, माजी आमदार बबनराव चौधरी, अनिलबापु देशमुख, बंटी चोपडा, विजय गाडेकर, राजेश लढ्ढा आदी मान्यवर उपस्थित होते. या बैठकीमध्ये भुधारकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी बुलडाणा यांना देण्यात आले. तसेच संबंधीत प्रकरणाची वर्गवारी करून 42 ब,क,ड कलमा अंतर्गत प्रकरणे नियमानुकूल करण्यात येण्यासंदर्भात एक महिन्याचे आत प्रस्ताव सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी व संबंधीत अधिकार्‍यांना मंत्री महोदयांनी दिले. चिखली येथील तीन हजारापेक्षा जास्त जमीन धारकांना त्यांच्याकडे असलेल्या अकृषक आदेश बनावट असल्याबाबतच्या नोटीस बजावण्यात आल्या होत्या व काहींवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले होते. तुरुंगांत जाण्याची सुद्धा वेळ आली होती. त्यामुळे चिखली परिसरात अनेक भुधारकांचे मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget