Breaking News

सरपंचांनी गावच्या विकासासाठी काम करावे : गजानन चनेवार


मेहकर,(प्रतिनिधी): ग्रामीण पातळीवर गावाच्या विकासासाठी सरपंच हा महत्वाचा दुवा आहे. शासनाकडुन गावाच्या विकासासाठी विविध योजना सुरू आहेत. त्या योजनोचा जास्तीत जास्त फायदा घेवून आपल्या गावच्या विकास साधावा असे आवाहन घाटबोरीचे सरपंच गजानन चनेवार यांनी केले. घाटबोरी येथे 25 नोंव्हेंबर रोजी सरपंच मेळावा आयोजीत करण्यात आला होता, कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी वामन आप्पा चुकेवार हे होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन गट शिक्षणाधिकारी किशोर पागोरे, ज्ञानेश्‍वर शेळके, प्रमोद बापु देशमुख जिल्हाध्यक्ष ग्रामीण पत्रकार संघ, शाम सुर्वे माजी सरपंच पांगरखेड, दत्ता उमाळे प़़़त्रकार,दिलीप बापु देशमुख,हिंमत महाराज, जयराम महाराज संस्थान टेंभुरखेड, वासुदेव खुळे उपस्थित होते. या मेळाव्यात सरपंचांना येणार्‍या विविध अडचणी या संदर्भात मान्यवरांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाला डॉ. नंदकिशोर देशमुख सरपंच विजय जाग़त, तांगडे, काळे, लठाड, सावंत, विठठल महाराज, पुरूषोत्तम पाटील, डॉ. शिवशंकर डोंगरे, प्रकाश दांदडे, पुरूषोत्तम लोखंडे, श्रीराम पवार, यशवंतराव अंभोरे, शंकर पाटील, संदीप देशमुख, यशवंतराव अंभोरे, देवानंद अंभोरे, पंकज वकील, संजय सुळकर आदींची उपस्थीती होती. कार्यक्रमाचे सु़त्रसंचालन अरविंद राठोड यांनी तर आभार प्रदर्शन गणेश नवले यांनी केले.