Breaking News

ठाण्यातील पोलिसांच्या घराच्या प्रश्नासाठी म्हाडा अध्यक्षाने केला दौरा


ठाणे : प्रतिनिधी
ठाण्यातील वर्तक नगर परिसरात असणाऱ्या पोलीस वसाहतीत राहणाऱ्या पोलीस बांधवांच्या घराचा प्रश्न पुढील दोन ते तीन महिन्यात मार्गी लागणार असून पोलिसांना घर देण्यासाठी आज म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी ठाण्याच्या वर्तकनगर परिसरातील पोलिसांच्या घराचा दौरा करून पाहणी केली.


पोलिसांच्या घराच्या प्रश्नावर म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या उपस्थित एक संयुक्त बैठक घेतली. या बैठकीनंतर म्हाडा आणि पोलीस आयुक्तालय सकारात्मक आहेत. आज उदय सामंत यांनी वर्तक नगर येथील जागेची पाहणी केली त्या नंतर एक बैठक घेतली सदरच्या बैठकीला स्थानिक आमदार प्रताप सरनाईक देखील उपस्थित होते . गेल्या १० वर्ष्यापासून या ठिकाणी असणाऱ्या पोलीस वसाहतींचा पुनर्विकासाचा प्रश्न निर्माण झाला होता या साठी सदरची बैठक आयोजित केली होती. या प्रश्नाच्या बाबतीत आमदार प्रताप सरनाईक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर देखील चर्चा करणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितलं आहे