Breaking News

खासदार गांधींच्या पाठपुराव्यामुळेच एमआयडीसीचा विकासनगर । प्रतिनिधी -
मीडिया इंडिया कंपनीमुळे लवकरच सुपा परिसर विकसित होणार आहे. महाराष्ट्राचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांना महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करण्याचे निमंत्रण दिले आहे. महाराष्ट्रामध्ये सुरू होणार्‍या या सर्व कंपन्यांना राज्य सरकार सर्वतोपरी सहकार्य करणार आहे. आंतराष्ट्रीय स्तरावर भारत 147 व्या स्थानावरून आज 77 व्या स्थानावर आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयामुळे हे शक्य झाले आहे. भारताच्या या प्रगतीमध्ये महाराष्ट्राचा मोठा सहभाग आहे, हे सांगतांना मला अभिमान वाटत आहे. माझे मित्र नगरचे खासदार दिलीप गांधी हे सातत्याने नगरच्या एमआयडीसीमध्ये गुंतवणूक करण्याबाबत पाठपुरवठा करत आहेत. मोठ्या कंपन्यांसाठी भरपूर जागा उपलब्ध असल्याचे सांगत आहेत. आता मिडिया इंडियासारखी मोठी कंपनी आली आहे. त्यामुळे खासदार गांधींच्या मागण्या पूर्ण होत आहेत. या कंपनीला सुपा येथे चांगला प्रतिसाद मिळाल्यावर भविष्यात या कंपनीमुळे अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या येथे येथील. त्यामुळे या परिसरातील युवकांना सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे याचा फायदा सर्वांनी घ्यावा, असे प्रतिपद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

सुपा एमआयडीसी येथील मीडिया इंडिया प्रा. लि. या आंतरराष्ट्रीय कंपनीचा शिलान्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाल्यावर आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, खा. दिलीप गांधी, कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर कृष्णा सचदेव, मीडिया ग्रुप चेअरमन पॉल फंग, मीडिया ग्रुप मेडिया ग्रुप चीनचे संस्थापक हे झियांगजीन, आमदार शिवाजी कर्डिले, आमदार विजय औटी, आमदार बाळासाहेब मुरकुटे, एमआयडीसीचे मुख्याधिकारी पी. अन्बलगन आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले, मीडिया इंडिया कंपनी या भागाच्या विकासासाठी माइल स्टोन ठरेल. महाराष्ट्रामध्ये आता सरकारच्या चांगल्या धोरणांमुळे औद्योगिक क्षेत्र वाढत आहे. अनेक देशांच्या मोठ्या कंपन्या राज्यात गुंतवणूक करत आहेत. चांगल्या रोजगाराची सुवर्ण संधी या परिसरातील युवकांना या बहुराष्ट्रीय कंपनीमुळे मिळणार आहे. आणखीही बर्‍याच मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याचे निमंत्रण चीनला दिले आहे. त्यामुळे लवकरच अनेक कंपन्या महाराष्ट्रात येणार आहेत.
प्रारंभी इंडिया कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर कृष्णा सचदेव यांनी प्रास्ताविकात सर्वांचे स्वागत केले. गायत्रीमंत्राच्या उच्चारात मुख्यमंत्री फडणवीस यांनी दीपप्रज्वलन केले. यावेळी मोठ्या संख्येने विविध क्षेत्रातील नागरिक उद्योजक, कारखानदार उपस्थित होते.