सातार्‍यात कास्ट्राईब संघटनेचे धरणे


सातारा (प्रतिनिधी) : मागासवर्गीय भरती गेली चार वर्षापासून बंद आहे. त्यामुळे मागासवर्गियांचा सरळसेवा भरतीचा अनुशेष हा लाखोच्या घरात गेला आहे. याबाबत कॉस्ट्राईब संघटनेच्यावतीने अनेकदा शासनाकडे मागणी करण्यात आली आहे. मात्र त्याच विचारही केलेला नाही. त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले असल्याने शासनाच्या विरोधात महाराष्ट्रातील सर्व कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 1980 च्या शासननिर्णयानुसार मागासवर्गीय कर्मचारी अधिकारी यांना महत्वाच्या जागांवर नेमणूका देवून समान न्यायाची भूमिका पार पाडण्याबाबत निर्देशित करण्यात आले आहे. मात्र अशा जागांवर मागासवर्गीय कर्मचार्‍यांची भरती झालेली नाही. तसेच विद्यापीठ कर्मचार्‍यांचा प्रश्नही अनुत्तरीतच आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवरही परिणाम होत आहे.

तसेच मागासवर्गियांच्या पदोन्नतीचा निकाल कर्मचार्‍यांच्या बाजूने लागूनही शासनाने तसे परिपत्रक न काढल्याने अनेक मागासवर्गीय पदाधिकार्‍यांची पदोन्नती रखडली आहे. माध्यमिक व प्राथमिक संदर्भात एमएससीआयटी वसुली थांबवावी, अभावित केंद्रप्रमुखांना कायम करावे, पालिकेतील शिक्षकांचे वेतन 80 टक्के व 20 टक्के असे न देता सरसकट 100 टक्के द्यावे, सातारा जिल्ह्यातील अवघड व क्षेत्र व सर्वसाधारण क्षेत्र याचे फेर सर्व्हेक्षण करून यादी निश्चित करावी, जिल्हाअंतर्गत झालेल्या बदलीमध्ये शिक्षकांना योग्य न्याय मिळावा, केंद्रस्तरावरती डाटा एंट्री ऑपरेटरची भरती करावी यासह अनेक मागण्यांसाठी हे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी विभागीय सचिव प्रवीणकुमार चांदणे, सुशीलकुमार कांबळे, मिलींद कांबळे, प्रशांत मोरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget