Breaking News

खडकी(घाट)येथील किर्तनात ह.भ.प.गणेश महाराज फरताडे यांचे किर्तन

चौसाळा (प्रतिनिधी) बीड तालुक्यातील खडकी(घाट) येथे बलीप्रतिपदेच्या निमित्ताने युवा किर्तनकार ह.भ.प.गणेश महाराज फरताडे यांचे प्रबोधनपर किर्तन आयोजित केले होते. यावेळी शेतकरी आत्महत्या करतो याविषयावर सुंदर चिंतन ह.भ.प.गणेश महाराज फरताडे यांनी मांडले...शिवबा आणि बळीराजा सारख्या महान राजे असलेल्या मातीत शेतकर्‍यावर आत्महत्या करण्याची वेळ यावी यापेक्षा दुसरं दुःख असू शकत नाही.
असेही यावेळी गणेश महाराज म्हणाले.... शेतकर्‍यांनी आता शेतीला जोडून व्यावसायाकडे वळले पाहिजे असे ही प्रतिपादन त्यांनी केले. या कीर्तन सोहळ्याला प्रमुख उपस्तिथी ह भ प अतुल महाराज येवले, शिवव्याख्याते संदीप कदम ,योगेश ठोसर ,अशोक मोरे, ए आय एस एफ चे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता भोसले, आदित्य भोसले, ईश्वर सुरवसे,मंगेश मोरे, धनंजय गोंदावले,सह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.