Breaking News

कॉंग्रेसची जनसंघर्ष यात्रा आज अंबाजोगाईत पोहोचणार मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे मोदी यांचे आवाहन


अंबाजोगाई (प्रतिनिधी) महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री खासदार अशोकरावजी चव्हाण यांनी शासनाच्या विरोधात महाराष्ट्राच्या हितासाठी आणि जनतेला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी महाराष्ट्रात जनसंघर्ष यात्रा सुरु केली आहे.ही जनसंघर्ष यात्रा आज गुरूवार,दि.१ नोव्हेंबर २०१८ रोजी अंबाजोगाईत येणार असून यावेळी शहरातील वंजारी वसतीगृहाच्या मैदानात सकाळी दहा वाजता भव्य जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.तरी जनसंघर्ष यात्रा व जाहीर सभेस बीड जिल्ह्यातील जनतेने तसेच कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकारी,सर्व तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन बीड जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्या वतीने करण्यात येत आहे. जनसंघर्ष यात्रेविषयी बोलतांना बीड जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी म्हणाले की,महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री खा.अशोकरावजी चव्हाण साहेब, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्त्वाखाली कॉंग्रेस हा राज्यात सक्षम विरोधी पक्ष म्हणून प्रभावीपणे काम करीत आहे.भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाने जनतेच्या विविध प्रश्‍नांसाठी रस्त्यावर येवून आंदोलने,मोर्चे काढले आहेत हा संघर्ष म्हणजे केवळ विरोधासाठी विरोध नाही तर सकारात्मक दृष्टिकोनातून कॉंग्रेस पक्ष काम करीत आहे.जनसंघर्ष यात्रेेचे २ टप्पे यशस्वी झाले.

हा ३ रा टप्पा आहे. हे काम सोप काम नाही.सत्तेत राहून सत्ता चालविणे व सत्ता नसतांना जनतेच्या प्रश्‍नांनासाठी रस्त्यावर येवून लोकचळवळ उभी करणे यासाठी वेळ द्यावा लागतो,सर्वांना सोबत घेवून चालवे लागते.सर्वांशी सुसंवाद ठेवावा लागतो.हीच कार्यशाली प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेबांची असून महाराष्ट्रात अठरापगड जाती धर्मांच्या लोकांना न्याय देत असतांना शेतकरी,कष्टकरी, युवक,महिला,आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या सर्वांसाठी चव्हाण साहेब मोठ्या तळमळीने आज काम करीत आहेत. निवडणुकीच्या काळात केंद्रात सत्ता नसताना राज्यात पक्ष संघटना टिकविणे,वाढविणे व सर्व लोकांना सोबत घेवून महाराष्ट्रातील शेतकरी,कष्टकरी, विद्यार्थी आणि युवकांच्या प्रश्‍नांसाठी जनसंघर्ष यात्रा काढली आहे.बीड जिल्ह्यात अंबाजोगाई येथे गुरुवार,दि.१ नोव्हेंबर रोजी वंजारी वसतीगृहाच्या मैदानात जनसंघर्ष यात्रेचे जाहिर सभेत रुपांतर होणार आहे.यावेळी महाराष्ट्र राज्याचे प्रभारी खा.मल्लिकार्जुन खर्गे, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री खा.अशोकरावजी चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते ना.राधाकृष्ण विखे पाटील,माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,माजी मंत्री नसिम खान,माजी खा.रजनीताई पाटील, आ.विश्‍वजित कदम, रामकिशन ओझा,शाह आलम,माजी मंत्री अशोकराव पाटील, माजी मंत्री प्रा.सुरेशराव नवले,जिल्हा प्रभारी भिमराव डोंगरे, प्रा.सत्संग मुंडे, प्रा.टि.पी.मुंडे,माजी आ.सिराज देशमुख, दादासाहेब मुंडे आदींसह पक्षाचे राज्यपातळीवरील नेते यांची प्रमुख उपस्थित लाभणार आहे. यावेळी जनसंघर्ष यात्रेत सहभागी होणार्या व जाहिर सभेस उपस्थित राहणार्या जनतेस हे नेते मार्गदर्शन करणार आहेत.शहरातील वंजारी वसतीगृहाच्या मैदानात होत असलेल्या सभेच्या आयोजनाची जय्यत तयारी करण्यात आली असून तयारीचा आढावा बीड जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी बुधवार,दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी घेतला. 
जनसंघर्ष यात्रेविषयी बोलतांना राजकिशोर मोदी म्हणाले की, राज्यात यंदा अत्यल्प पावसामुळे भिषण दुष्काळ पडला आहे. तेव्हा राज्यात तात्काळ दुष्काळ जाहिर करावा ही प्रमुख मागणी व दुष्काळक्षेत्र पाहणीचे काम जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून होत आहे. भाजपा सरकारने जनतेला दिलेले एकही आश्‍वासन पूर्ण केलेले नाही.उलट वारंवार खोटे बोलून जनतेची मोठी फसवणुक व विश्‍वासघात केला आहे.आज शेतकरी, कष्टकरी, दलित, अल्पसंख्यांक,महिला, विद्यार्थी व युवक हे सर्वच समाजघटक भाजपा सरकारवर नाराज आहेत.मराठा, मुस्लिम, धनगर समाज बांधव आरक्षणाच्या मागणीसाठी सातत्याने आंदोलने करीत आहेत.त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रच आज भाजपा व शिवसेना सरकार विरोधात रस्त्यावर उतरलेला आहे.त्यामुळे ठिकठिकाणी जनतेचा कॉंग्रेसने काढलेल्या जनसंघर्ष यात्रेला राज्यात सर्वञ मोठा प्रतिसाद मिळत आहे.या सभेत महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या सहित कॉंग्रेस पक्षाच्या राज्य पातळीवरील मोठ्या नेत्यांचे मार्गदर्शन होणार आहे.राज्यातील जनतेच्या हक्कासाठी व महाराष्ट्राच्या हितासाठी कॉंग्रेस पक्षाने राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा सुरु केली आहे.या जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून सरकारच्या जनविरोधी धोरणांबाबत जनजागृती करुन भाजपा शिवसेना सरकारला सत्तेवरुन खाली खेचण्यासाठी जनसंघर्ष यात्रेचा हा तिसरा टप्पा आहे.या सभेची जय्यत तयारी सध्या अंबाजोगाईत झाली आहे.तरी बीड जिल्ह्यातील कॉंग्रेस पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते,विविध सेलचे सर्व पदाधिकारी,सर्व तालुकाध्यक्ष कार्यकर्ते यांनी जाहिर सभेस उपस्थित रहावे असे आवाहन बीड जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी,बीड जि.प.चे सभापती राजेसाहेब देशमुख, माजी जिल्हा अध्यक्ष सर्जेराव काळे,संजय दौंड,प्रा.विजय मुंडे, महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षा मिनाक्षीताई पांडुळे, जिल्हा सरचिटणीस ऍड.विष्णुपंत सोळंके,अंबाजोगाई तालुकाध्यक्ष औदुंबर मोरे,शहराध्यक्ष महादेव आदमाने,युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष राणा चव्हाण तसेच विविध सेलचे जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी यांनी केले आहे.