दोन गटाचा वाद तहसील मध्ये पेटला


बीड, (प्रतिनिधी):- तालुक्यातील सुर्याचीवाडी आणि देवर्‍याचीवाडी गावातील दोन गटात पाणंद रस्त्यावरुन वाद होता. या प्रकरणात आज बीड तहसिलदारांसमोर सुनावणी झाली. त्यानंतर तहसिलदार एका बैठकीसाठी गेले. सुनावणी झाल्यानंतर संबंधित ग्रामस्थ बाहेर आले. यावेळी त्यातीलच काही जणांनी एका व्यक्तीस बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीच्या भितीने तो व्यक्ती थेट तहसिलदारांच्या दालनात घुसला. त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करुन त्यास शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आणले होते. बीड तालुक्यातील सुर्याचीवाडी आणि देवर्‍याचीवाडी येथील रस्त्याच्या वाद प्रकरणी तहसिल कार्यालयात सुनावणी झाली.

त्यानंतर दोन्ही गटाकडील लोकं बाहेर आल्यानंतर त्यातीलच काही जणांनी वसंत नवनाथ डोंगरे (रा.कर्झणी) यांना मारहाण केली. सदरील मारहाणीनंतर भितीने डोंगरे यांनी थेट तहसिलदारांच्या कॅबिनमध्ये गेले. त्याठिकाणी दाखल झालेल्या पोलिसांनी डोंगरे यांना शिवाजीनगर ठाण्यात आणले. सदरील प्रकाराची माहिती कळताच दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी शिवाजीनगर ठाण्यात गर्दी केली होती. या प्रकरणात दुपारी उशिरापर्यंत पोलिसात नोंद झालेली नव्हती.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget