स्पर्धा परीक्षेसाठी योग्य मार्गदर्शनाबरोबर सातत्य ठेवा; प्रशांतभाऊ गडाख यांची यशवंत स्टडी क्लबला भेट


नेवासा/प्रतिनिधी
नेवासेसारख्या ग्रामीण भागात स्पर्धा परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांकरिता आवश्यक सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देताना मला मनस्वी आनंद होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची भीती न बाळगता मनापासून अभ्यास करावा. स्पर्धा परीक्षेसाठी सातत्य व योग्य मार्गदर्शन आवश्यक आहे. असे प्रतिपादन मुळा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व माजी सिनेट सदस्य श्री.प्रशांत गडाख यांनी केले. नेवासा येथे मुळा एज्युकेशन सोसायटीच्या सहकार्याने सुरू असलेल्या यशवंत स्टडी क्लब या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राला दिलेल्या भेटीच्या वेळी ते बोलत होते. येथे आवश्यक असलेले दोन संगणक, प्रिंटर, प्रोजेक्टर, इन्व्हर्टर तसेच चांगल्या दर्जाचे मार्गदर्शक उपलब्ध करून देण्याचे ग्वाही त्यांनी दिली. 

यावेळी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. यशवंत स्टडी क्लबमधील अभ्यासिका व ग्रंथालय हे अतिशय उत्तम असल्याचे विद्यार्थी योगेश भणगे याने सांगितले. उत्तम दर्जाची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल विद्यार्थ्यांनी प्रशांत गडाख यांचा सत्कार केला. स्टडी क्लबच्या वतीने प्रकाश सोनटक्के यांनी पुस्तक देऊन प्रशांत गडाख यांनी सत्कार केला. यशवंत स्टडी क्लबचे समन्वयक महेश मापारी यांनी नेवासा तालुक्यातील विद्यार्थ्यांना शहरात जाऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणे कठीण असल्याने यशवंत स्टडी क्लब त्यांच्यासाठी दीपस्तंभ ठरेल असा विश्‍वास व्यक्त केला व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्टडी क्लबचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी कल्पना पंडित, नंदकुमार पाटील, रावसाहेब कांगुणे, काकासाहेब गायके, कारभारी वाखुरे, राजेंद्र उंदरे, अभिजित मापारी, प्रकाश सोनटक्के, सचिन शेटे, बाळासाहेब पालवे, रविंद्र आल्हाट, विशाल सुरडे, गणेश कोरेकर, अंबादास इरले, नारायण लोखंडे, वैभव नहार, सुनिल जाधव, राहुल राजळे, राजेंद्र चौधरी, बाळासाहेब कोकणे, विनायक नळकांडे उपस्थित होते. सूत्रसंचालनदेविदास साळुंके यांनी केले. आभार संदिप चव्हाण यांनी मानले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget