मनसेच्या इंजिनांची परस्परांत धडक!


मुंबई - लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या काही दिवसांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे झंझावाती दौरे काढत आहेत, तर मनसैनिकही कमालीचे आक्रमक झाले आहेत; मात्र पक्षासाठी अशी सकारात्मक परिस्थिती असताना मनसेच्या नेत्यांमध्येच खटके उडत आहेत. मुंबईत पालिकेच्या एल विभागीय कार्यालयामध्ये आंदोलन करण्यासाठी गेलेले मनसेचे नेते बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे यांच्यात मतभेद झाले. त्यामुळे या आंदोलनातून संदीप देशपांडे आणि अन्य काही कार्यकर्त्यांनी काढता पाय घेतला. 

परिसरातील विविध समस्या मांडण्यासाठी मनसेकडून मुंबई महानगरपालिकेच्या एल विभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या वेळी देशपांडे बोलू देत नसल्याने नांदगावकर नाराज झाले. त्यांनी मोर्चाच्या ठिकाणीच आपली नाराजी व्यक्त केली. या प्रकारामुळे देशपांडे आणि इतर कार्यकर्त्यांनी आंदोलनातून काढता पाय घेतला. 

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget