कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे


बुलडाणा,(प्रतिनिधी): कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने 26 नोव्हेंबर रोजी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुभाष डोंगरदिवे यांचे अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयापुढे धरण दिले. यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले की, सामान्य प्रशासन विभागाने दिनांक 11 ऑक्टोंबर 2008 रोजी काढलेल्या अद्यादेशाने सर्व मागासवर्गीय कर्मचार्‍यांनी धास्ती घेतलेली आहे. सद्यस्थितीतील पदोन्नतीच्या कोटयातील बिंदु नामावली तपासून दिलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार शासनाचे पुढील आदेश येईपर्यंत केवळ खुल्या प्रवर्गातील पदे भरण्याचे आदेश दिले आहेत. तो आदेश रद्द करण्यात यावा, राज्यात गेल्या 4 वर्षांपासून मागासवर्गीयांची भरती बंद केलेली आहे त्यामुळे मागासवर्गीयांचा 2,39,000 पद भरतीचा अनुषेश अद्याप शिल्लक आहे.

राज्यात पदोन्नतीचा अनुशेष 78000 पर्यंत शिल्लक राहुन शिगेला पोहचला आहे. तो अनुषेश तातडीने भरण्यात यावा, अनुकंपाची प्रकरणे वर्षानुवर्षे पडून आहेत. दुसरीकडे विविध विभागात कंत्राटी पदे लागु करुन मागासवर्गीयांचा अनुशेष कमी केला जात आहे, ती कंत्राटी पध्दत बंद करुन अनुशेष भरण्यात यावा, 2005 नंतरच्या नियुक्त कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी. दि. 3 डिसेंबर 1980 च्या शासन निर्णया नुसार निर्णयानुसार महत्वाच्या जागी मागासवर्गीय कर्मचारी, अधिकारी यांना नेमण्याचा धुळखात पडलेल्या आदेशाची अंमलबजावणी हावी, राज्यात मागासवर्गीय कर्मचारी अधिकारी यांचे खराब करण्यात आलेले गोपनीय अहवाल दुरुस्त करण्यात यावे. तसेच 12 वर्ष व 24 वर्षांची कालबध्द पदोन्नती ज्या कर्मचार्‍यांची थांबविण्यात आली आहे ती सुरु करण्यात यावी, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. या धरणे आंदोलनात सुभाष डोंगरदिवे, बी. डी. धुरंधर, अविनाश वाकडे, अशोक दाभाडे विभागीय, प्रशांत बोर्डे, सिदार्थ वानखेडे, एस.आर. वानखडे, दिलीप खंडारे, जी.एस. वाघ आय.टी.इंगळे, आर. बी. झोटे, डॉ. सुनिल गव्हांदे, जे. बी. जायभावे एन. डी. इंगळे, सुमंता पडधान, अनंता वानखडे, जी.एस.आंभोरे, दिपक पवार, कैलास तेलंग यांच्यासह मोठया संख्येनी कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget