ठोमसेगावच्या तिघांची युरोपमध्ये होणार्‍या ऍथलेटिक्ससाठी निवड


पाटण (प्रतिनिधी) : मिशन ऑल्मपिक ऑल इंडिया चॅम्पियनशिप नॅशनल गेम 2018-19 ऍथलेटिक्स 3000 मीटर धावण्याच्या स्पर्धेत ठोमसेच्या तिघांची युरोप मध्ये होणार्‍या स्पर्धेसाठी निवड झाली असून ठोमसेगावच्या सुपुत्रांनी गावाचे नाव सातासमुद्रापार नेले असून यात अनुक्रमे अक्षय लोहार याने गोल्ड मेडल, सचिन डोंगळे सिल्वर मेडल आणि शुभम माने याने ब्रॉंन्झ मेडल पटकावले. 

पुणे येथील सणस स्टेडियम येथे दि. 24, 25, 26 रोजी विविध क्रीडा प्रकारात झालेल्या मिशन ऑल्मिपिक ऑल इंडिया चॅम्पियनशीप मीटर ऍथलेटीक्स क्रीडा स्पर्धेत पाटण तालुक्यातील ठोमसे येथील तिघानी यश संपादन केले यामध्ये अक्षय लोहार यास गोल्ड मेडल, सचिन डोंगळे यास सिल्वर तर शुभम माने यास अनुक्रमे ब्रॉंन्झ मेडल मिळाले, तर 400 मीटर रनिंग क्रीडाप्रकारातही येथील प्रितम नलवडे यास ब्रॉंन्झ मेडल मिळाले या सर्वांची डिसेंबर मध्ये युरोप येथे होणार्‍या इंटरनॅशनल क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात, तमिळनाडू, झारखंड, उत्तरप्रदेश, गोवा, दिल्ली राज्यातून खेळाडूनी सहभाग घेतला होता त्यात सातारा जिल्ह्यातील शूरवीरांनी हे यश संपादन केले. पाटण तालुक्यातील या तिघांची निवड प्रेरणादाई ठरणार आहे. ठोमसे सारख्या खेड्यातील धावपटूने विशेष प्राविण्य मिळवल्यामुळे सातारा आणि पाटण तालुक्यात शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाणार आहे. 
यशस्वी युवकांचे कमांडो अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष दताञय भिसे, अध्यक्ष विकी भिसे सर व फिजिकल ट्रेनर फारुख इनामदार यांनी हार्दिक अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. पाटण तालुक्यातील क्रीडाप्रेमी तसेच राजकिय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी यशस्वी मुलांना शुभेच्छा देवून अभिनंदन केले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget