नोटाबंदी हा महाभयंकर राक्षसी धक्काः अरविंद सुब्रमण्यम


नवीदिल्लीः नोटाबंदीच्या निर्णयाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे माजी आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी अखेर मौन सोडले आहे. नोटाबंदी हा महाभयंकर राक्षसी धक्का असून नोटाबंदीमुळे देशाचा आर्थिक विकास मंदावला, अशा शब्दांत त्यांनी मोदी सरकारला फटकारले आहे.

सहा महिन्यांपूर्वीच सुब्रमण्यम यांनी मुख्य आर्थिक सल्लागारपदाचा राजीनामा दिला होता. नोटाबंदीच्या निर्णयाबाबत सुब्रमण्यम यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, की नोटाबंदीचा निर्णय हा एक महाभयंकर राक्षसी धक्का होता. या निर्णयामुळे एकाच फटक्यात चलनात असलेल्या 86 टक्के नोटा परत मागवण्यात आल्या. त्याचा परिणाम देशाच्या आर्थिक विकासावर झाला. खरे तर आधीपासूनच आर्थिक विकास मंदावला होता; मात्र नोटाबंदीच्या निर्णयामुळे यात भर पडली. नोटाबंदीच्या अगोदर विकास दर 8 टक्के होता; पण नोटाबंदीनंतरच्या तिमाहीत विकास दर 6.8 वर घसरला, असे त्यांनी सांगितले.’द टू पझल्स ऑफ डिमोनेटायझेशन- पॉलिटिकल अँड इकॉनॉमिक’ या पुस्तकात त्यांनी हे मत मांडले आहे.

ज्यावेळी नोटाबंदीसारखे धक्के बसतात, त्या वेळी सगळ्यात जास्त फटका असंघटित क्षेत्राला बसतो. अशा परिस्थितीत अर्थव्यवस्थेच्या आकलनासाठी नेहमीचे मोजमाप लावले, तर आर्थिक विकासाचा दर वाढलेला वाटतो. असंघटित क्षेत्र आकुंचन पावले तर त्याचा विपरीत परिणाम संघटित क्षेत्रावरही उमटतो आणि तो ही चांगलाच मोठा असायला हवा, सुब्रमण्यम यांनी नमूद केले आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget