Breaking News

‘इब्टा’ शिक्षक संघटनेची गेवराई तालुका नुतन कार्यकारिणी जाहीर


बीड (प्रतिनिधी)- रोजी इंडियन बहुजन टिचर्स असोसिएशन (इब्टा) या शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेची महत्वपूर्ण बैठक साई मंगल कार्यालय गेवराई येथे संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल विद्यागर यांच्या अध्यक्षतेखाली तर जिल्हा सचिव बाबासाहेब ओव्हाळ, जिल्हा कार्याध्यक्ष शिवाजी सानप, उपाध्यक्ष जानिकराव कुरुंद, शाहुराव जायभाये, खाजगी विभाग उपाध्यक्ष गणेश वाघ, जिल्हा सह सचिव बालासाहेब मंदे, प्रसिध्दी विभाग प्रमुख सोमिनाथ दौंड, सहकोषाध्यक्ष हरिभाऊ धोंडे, वडवणी तालुकाध्यक्ष बापूसाहेब धन्वे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होऊन सर्वानुमते नुतन गेवराई तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

गेवराई तालुका नुतन कार्यकारिणी पुढील प्रमाणे, अध्यक्ष -गणपत पाबळे, सचिव विकास घोडके, कार्याध्यक्ष-अनिल मेंडके, कोषाध्यक्ष-सुभाष भास्कळ, उपाध्यक्ष आण्णासाहेब ढेरे, आशिष फुलझळके, हरिभाऊ गोरवे, सहसचिव-राहुल साळवे, सहकोषाध्यक्ष -चंद्रकांत मेंडके, सहकार्याध्यक्ष-कृष्णा यादव, मार्गदर्शक-श्रीकृष्ण वाघ, कैलास गर्जे, संघटक-भास्कर गचांडे, सदस्य-हनुमान नागरगोजे, जालींदर साखरे इत्यादी. सदरील कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करुन झाली. त्यानंतर आयोजकांच्या वतीने कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांचे शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. त्यानंतर सर्वानुमते नुतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. व नुतन पदा अधिकार्‍यांचे जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने शाल, पुष्पहार, श्रीफळ व नियुक्तीपत्र देवून अभिनंदनपर सत्कार करण्यात आला.