Breaking News

वडूज नगरपंचायतीच्या प्रभारी नगराध्यक्षपदी विपुल गोडसे


वडूज (प्रतिनिधी) : वडूज नगरपंचायतीच्या प्रभारी नगराध्यक्षपदी विद्यमान उपनगराध्यक्ष विपुल पोपटराव गोडसे यांची नियुक्ती झाली आहे. नगराध्यक्ष शोभा सचिन माळी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने नव्याने नगराध्यक्ष निवडीपर्यंत वडूज नगरपंचायत नगराध्यक्ष प्रभारी कारभार विपुल पोपटराव गोडसे यांनी माजी नगराध्यक्ष शोभा सचिन माळी यांच्याकडून स्विकारला. यावेळी मुख्याधिकारी माधव खांडेकर, बांधकाम समिती सभापती वचनशेठ शहा, नगरसेवक शहाजीराजे गोडसे, अभय देशमुख, अनिल माळी, प्रदीप खुडे, डॉ. प्रशांत गोडसे, संजय काळे, अमोल वाघमारे, विजय शिंदे उपस्थित होते.

गत दोन वर्षात आपण प्रामाणिकपणे वडूज शहराचा विकास साधण्याचा प्रयत्न केला. त्यात मला सर्व नगरसेवक, नगरसेविका, कर्मचारीवृंद तसेच वडूजच्या नागरिकांनी मोलाची साथ दिली. यापुढे वडूजकरांच्या विकासासाठी अहोरात्र काम करणार आहे. त्यामुळे याआधी जसे सर्वांनी मला सहकार्य केले तसेच विपुल गोडसे यांना सहकार्य करावे, असे आवाहन माजी नगराध्यक्ष शोभा माळी यांनी केले.