दिपावली पाडवा स्नेहमिलन सोहळा संपन्न


बीड (प्रतिनिधी)- येथील माहेश्‍वरी प्रगती मंडळाच्या वतीने गुरूवार दि.०८ नोव्हें रोजी बालाजी मंदीर सभागृहात माहेश्‍वरी समाज बांधवांसाठी वार्षिक दिपावली स्नेहमिलन सोहळ्याचे आनंद आणि उत्सावाच्या वातावरणात आयोजन करण्यात आले. सोहळ्यात माहेश्‍वरी समाजातील बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या कार्यक्रमाची सुरूवात माहेश्‍वरी परिवारातील जेष्ठ सदस्य श्री चंदुलालजी कलंत्री, डॉ.रामेश्‍वरजी चितलांगे, रामबिलासजी जाजू (कळंबकर), कार्यकारी मंडळाचे पदाधिकारी, प्रकल्प सभापती आदींच्या शुभ हस्ते महेश भगवानजी यांची महापूजा तसेच दिपप्रज्वलन तसेच महेश भगवानजींची महाआरती करण्यात आली. पुणे येथील डॉ.गोविंद कासट यांचे माहेश्‍वरी प्रगती मंडळाचे अध्यक्ष ऍड.विजरकुमार कासट, उपाध्यक्ष गंगाबिशन करवा, सचिव डॉ. राजेंद्र सारडा, बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget