Breaking News

विधवा- दिव्यांग मेळवा व गायण स्पर्धा संपन्न दिव्यांग राजू मिस्कीन यांनी केले मेहुणाराजा येथे आयोजन


(प्रतिनिधी) तालुक्यातील मेहुणाराजा येथील दिव्यांग राजू मिस्कीन यांनी  विधवा, दिव्यांग मेळावा व गायण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी निरुपमा डांगे यांच्या सुचनेनुसार तालुक्यात दिव्यांगांसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. मेहुणाराजा येथील उच्च माध्यमीक शाळेत 2 नोव्हेंबर रोजी स्वतः अंध असलेले राजु मिस्कीन यांनी विधवा व अंध, तसेच अपंग व दिव्यांग असंख्य समस्यांनी ग्रासलेले आहेत, त्यासाठी दिव्यांग शाहीर व कलावंताच्या न्याय हक्कासाठी विवधि कार्यक्रमाचे आयोजन केले होते. गायण स्पर्धेत 50 ते 60 दिव्यांगाती सहभाग नोंदविला होता. याप्रसंगी प्रमुख राजु मिस्कीन यांनी भजन, गोंधळ, भारुड, या कलेस समाज प्रबोधन करुन शासना पर्यंत आपल्या न्याय व हक्काचे अनुदान व योजना कशा मिळतील हे प्रयेक सपर्धकांनी देखील आपल्या कलेतून सादर केले.या स्पर्धेचे परिक्षक म्हणून न्याब संस्थेच्या वतीने डॉ. चिंचोले डॉ.चवरे व राजु मिस्कीन यांनी काम पाहिले.

महिला गटातून प्रथम पार्वताबाई चाटे, द्वितिय मथुरा शिंदे, तृतिय दृपदाबाई खांडेभराड तसेच पुरुष गटातून प्रथम गोविंद शिंदे, द्वितिय त्र्यंबक चाटे, तृतिय लक्ष्मण चाटे यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस देण्यात आले. यावेळी जिजामाता भजनी मंडळ मेहूणाराजा, पेटी मास्तर अनिल जाधव, सुखदेव काकडे, प्रकाश काकडे, नाल मास्तर दत्ता जाधव सहभागी झाले होते. या कार्यक्रमास मेहूणाराजा येथील सरपंच, पोलिस पाटील, ग्रामपंचायत सदस्य,तंटा मक्ती अध्यक्ष आणि सदस्य, पंचायत समिती अधिकारी व सदस्य व गावकरी उपस्थित होते. कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी महादेव चाटे, उमानी खराडे, प्रल्हाद खराडे, अशोक खराडे, गजानन वैद्य, अरुण शिंगणे, ज्ञानेश्‍वर शिंगणे यांनी परिश्रम घेतले.