‘राफेल’मुळे देशाच्या सुरक्षेचाही खेळखंडोबा : प्रशांत भूषण


रायपूर : बोफोर्स प्रकरण हा केवळ भ्रष्टाचार होता. मात्र, आताचे राफेल प्रकरण हा आर्थिक घोटाळ्यासह देशाच्या सुरक्षेचाही खेळखंडोबा आहे, असा थेट आरोप वकील आणि सामाजिक कार्यकर्ते प्रशांत भूषण यांनी व्यक्त केले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यांना बोफोर्स आणि राफेल करारांची तुलना करता येईल का, असा प्रश्‍न विचारण्यात आला होता.

भूषण म्हणाले, की राफेल प्रकरण हा केवळ आर्थिक भ्रष्टाचार नसून यामध्ये रिलायन्ससारख्या नवख्या कंपनीला लढाऊ विमान तयार करण्याचा परवाना दिला आहे. हा प्रकार म्हणजे थेट देशाच्या सुरक्षेशीच समझोता करण्यात आला आहे. यामुळे हे प्रकरण अधिक गंभीर आहे. बोफोर्स तोफांच्या खरेदीत 64 कोटींच्या कमिशनचा घोटाळा होता. मात्र, त्यात राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहोचत नव्हता. राफेल करारात मात्र, कमिशनचा घोटाळा 20 हजार कोटी एवढा प्रचंड आहे. शिवाय, देशाची सुरक्षितताही धाब्यावर बसवली आहे.
माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा, अरुण शौरी यांच्यासह भूषण यांनी राफेल कराराची सीबीआय चौकशी व्हावी, या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकांच्या मागणीनुसार, न्यायालयाने 36 राफेल लढाऊ विमानांच्या किमतींचा तपशील बंद लिफाफ्यातून 10 दिवसांत सादर करावा, असा आदेश बुधवारी दिला आहे.


Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget