Breaking News

दुष्काळी परिस्थिती असल्याने वाढदिवसाला हारतुरे स्वीकारणार नाही -पंडित


गेवराई (प्रतिनिधी) : गेवराई विधानसभा मतदार संघासह बीड जिल्ह्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती असल्याने यावर्षी आपण वाढदिवसानिमित्त कोणतेही हार-तुरे स्वीकारणार नाही. त्यामुळे मित्र मंडळी व कार्यकर्त्यांनी वाढदिवसाला पुष्पहार, पुष्पगुच्छ आणू नयेत असे आवाहन जि प सभापती युधाजित पंडित यांनी केले आहे. बीड जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती युधाजीत पंडीत यांचा दि ३ नोव्हेंबर रोजी वाढदिवस आहे. 

आपल्या मनमिळावू स्वभाव व अडचणी च्या वेळी सामान्यांच्या मदतीला जाण्याच्या कार्यपद्धतीमुळे गेवराई तालुक्यासह बीड जिल्ह्यामध्ये युधाजित पंडित यांचा मोठा चाहता मित्रपरिवार निर्माण झाला आहे.