Breaking News

शिवसेनेच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा फुले यांना अभिवादन


बीड (प्रतिनिधी) जिल्हा शिवसेनेच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या १२८ व्या पुण्यतिथी निमित्त शहरातील सिध्दीविनायक संकुल, क्रांतीसूर्य चौकात असलेल्या महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून विनम्र अभिवादन करण्यात आले. 

यावेळी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, विधानसभाप्रमुख(शहर) नितीन धांडे, तालुका समन्वयक प्रा रणजित आखाडे, शहरप्रमुख सुनील सुरवसे, युवासेना तालुकाप्रमुख राहुल साळुंके, यशराज घोडके, सरपंच माने, विभागप्रमुख आदिनाथ भांडवले, शाखाप्रमुख विकास गवते, दुष्यन्त डोंगरे, गणेश राऊत आदींसह शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.