Breaking News

भाजपचा उन्माद वाढला, राहुलची जीभ कापली; काँग्रेस कार्यकर्तीला बलात्काराची धमकी


पणजी/छत्तीसगडः भाषण देऊन परतणार्‍या एका युवा काँग्रेस नेत्याची जीभ कापण्यात आली आहे, तर गोव्यात काँग्रेसच्या एका कार्यकर्तीला बलात्कार करण्याची धमकी देण्यात आली आहे. दोन्ही ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांवर आरोप करण्यात आले आहेत. सत्तेची मस्ती डोक्यात गेल्याचा हा परिणाम असून त्याचा भाजपला निवडणुकीतही फटका बसण्याची शक्यता आहे. 

छत्तीसगडच्या बेमतरा जिल्ह्यात काँग्रेस उमेदवार रवींद्र चौबे यांच्या समर्थनार्थ राहुल दानी या युवा नेत्याने भाषण दिले. हे भाषण दिल्यावर राहुल परतत होता. त्या वेळी त्याच्यावर हल्ला करून त्याची जीभ छाटण्यात आली. या घटनेनंतर राहुलला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे; मात्र त्याची प्रकृती नाजूक असल्याचे समजते. या ठिकाणी त्याच्यावर सर्जरीही करण्यात आली आहे. या हल्ल्याचा राहुलवर एवढा परिणाम झाला की तो कोमामध्ये गेला. राहुलची जीभ कापल्याची घटना 31 ऑक्टोबरला घडल्याचे समजते आहे. राहुल भाषण करून परतत होता. त्यानंतर तो एका ढाब्यावर जेवणासाठी थांबला. त्या वेळी अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला केला. त्याला जबर मारहाण करण्यात आली. त्यानतंर त्याची जीभ कापण्यात आली. त्यानंतर त्याला रस्त्याच्या एका कडेला टाकून हल्लेखोर पळाले. रस्त्यावरून जाणार्‍या लोकांनी त्याला तातडीने रूग्णालयात दाखल केले. आता त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

अज्ञात हल्लेखोरांनी आपल्याला जबर मारहाण केली आणि मरणासन्न अवस्थेत सोडून पळून गेले. तीन दिवस कोमामध्ये राहिल्यावर राहुलला शुद्ध आली. तुला भाषण देण्याची जास्त हौस आहे. आता तुझी जीभच कापतो असे हल्लेखोर ओरडत होते, असेही राहुलने सांगितले आहे. या हल्ल्यात राहुलच्या चेहर्‍याला गंभीर इजा झाली आहे. 

भाजप नेते सुभाष शिरोडकर यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला गँगरेपची धमकी दिल्याचा आरोप दिव्या शेटकर यांनी केला आहे. शेटकर या गोवा प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या सचिव आहेत. या संदर्भात त्यांनी पोलिसातही तक्रार नोंदवली आहे. एवढेच नाही, तर आपल्याला जीवे मारण्याचीही धमकी देण्यात आल्याचे शेटकर यांनी म्हटले आहे. शिरोडकर हे गेल्याच महिन्यात भाजपमध्ये सहभागी झाले आहेत. त्यांना गोवा सरकारने इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे संचालक पद दिले आहे. शिरोडकर यांच्या कार्यकर्त्यांवर शेटकर यांनी आरोप केला आहे, की त्यांनी आपल्याला जीवे मारण्याची आणि गँगरेपची धमकी दिली. मला त्यासंदर्भातले फोन येत असल्याचेही शेटकर यांनी म्हटले आहे. रविवारी सकाळी एका अनोळखी क्रमांकावरून मला धमकी देण्यात आली होती, असेही त्यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे. शिरोडा क्षेत्रात तुम्ही शिरोडकरांविरोधात आवाज उठवाल तर याद राखा, असेही धमकी देणार्‍याने आपणास बजावले असल्याचे शेटकर म्हणाल्या आहेत.

शिरोडकर नॉट रिचेबल
दिया शेटकर यांनी केलेल्या गंभीर आरोपाबाबत शिरोडकर याच्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांच्यांंशी ंपर्क होऊ शकला नाही. त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.