Breaking News

काळोशीच्या सरपंचपदी कल्पना डफळ बिनविरोध


सातारा  : (प्रतिनिधी) : परळी खोर्‍यातील काळोशी गावाने आम्हाला सदैव साथ दिली आहे. काळोशी गावाच्या विकासासाठी मी सदैव कटीबद्ध राहीन अशी ग्वाही आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली.

काळोशीच्या सरपंचपदी कल्पना डफळ यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांच्या सत्कारप्रसंगी आमदार शिवेंद्रराजे बोलत होते. यावेळी उपसरपंच संजय डफळ, गणेश डफळ, सुरेखा निकम, संतोष डफळ, भिकू निकम, संजय निकम, शंकर निकम, प्रवीण गंगावणे, महेश निकम, सोपान डफळ, सचिन डफळ उपस्थित होते.

आमदार शिवेंद्रराजे पुढे म्हणाले, यापूर्वी काळोशी गावात रस्ता आणि पाण्याची सुविधा केली होती, त्यानंतरच्या गावाच्या विकासाकडे दुर्लक्ष झाले होते. मात्र, आता आगामी काळात अंबवडेफाटा ते काळोशी गावापर्यंत तसेच अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण, समाज मंदिर, सभागृह, व्यायामशाळा यासह गावात रस्त्यात येणार्‍या पुलाचे काम करणार असे आश्वासन शिवेंद्रसिंहराजे यांनी दिले. 

यावेळी गावातील विविध समस्यांबाबत ग्रामस्थांशी चर्चा करण्यात आली. लवकरात लवकर या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असा शब्द शिवेंद्रराजे यांनी यावेळी ग्रामस्थांना दिला. त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.