मोटारसायकलींच्या धडकेत एक ठार तिघे जखमी


शिरूर (प्रतिनिधी) - तालुक्यातील तांदळी येथील माळवाडी जवळ दोन मोटारसायकलींच्या अपघातात एक जण जागीच ठार तर दोन महिला व एक पुरुष गंभीर जखमी झाले असून जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सुरेश विठ्ठल धावडे (वय 35, रा. आलेगाव पागा, ता. शिरूर), असे मयताचे नाव आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, धावडे हे बुलेटवरुन काष्टी येथे बाजारासाठी गेले होते. बाजार आटोपून ते मांडवगण फराटाच्या दिशेने घरी येण्यास निघाले असता तांदळी येथील माळवाडी जवळ तांदळी-मांडवगण फराटा या रस्त्यावर तांदळीच्या दिशेने जाणार्‍या स्प्लेंडर गाडीची व बुलेटची समोरासमोर जोरदार धडक बसली. या अपघातात धावडे यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते जागीच ठार झाले. तर दोन महिला व एक पुरुष गंभीर जखमी झाला. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. 

शिरुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस हवालदार बाळासाहेब खोमणे पोलीस कॉन्स्टेबल अशोक तारु हे करीत आहेत.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget