कल्याणमध्ये विहिरीत बुडून पाच जणांचा मृत्यू


कल्याण : विहिरीत पडून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यात दोन मुले आणि अग्निशमन दलाच्या दोन जवानांचा समावेश आहे. कल्याण पूर्वेच्या नेतिवली परिसराती लोकग्राम परिसरात ही दुर्घटना घडली आहे. विहिरीत पडलेली दोन्ही मुले स्थानिक असल्याची प्राथमिक माहिती आहे. या मुलांना विहिरीतून बाहेर काढताना दोन जवानांचाही मृत्यू झालाय. या ठिकाणी मदतीला असलेला एक कर्मचारीही विहिरीत पडून मृत्यूमुखी पडला आहे. ही मुले विहिरीजवळ कशासाठी गेली होती, याचा तपास सुरू आहे. 

विहिरीच्या सफाईसाठी एक कर्मचारी उतरला होता. त्याला बाहेर काढण्यासाठी उतरलेल्या इतर दोन व्यक्तीही विहिरीत बेपत्ता झाल्या. तर या तिघांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाचे दोन कर्मचारी उतरले होते, असे मिळून पाचही जण बेपत्ता झाले. बचाव आणि शोधकार्य युद्ध पातळीवर सुरु आहे. आतापर्यंत दोन जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget