Breaking News

आगीत जळालेल्या घर मालकांना त्वरित मदत करा : लक्ष्मण घूमरे


घाटबोरी,(प्रतिनिधी) : मेहकर तालुक्यातील घाटबोरी गावात 2 अक्टूबरच्या मध्यरात्री अचानक आग लागून तीन घरे जळून भस्मसात झाली सदर कुटुंब ऐन दिवाळीच्या सणाला उघडयावर पडले असून त्यांना प्रशासनाने तातडीची आर्थीक मदत करावी अशी मागणी काँग्रेस पक्षाचे नेते लक्ष्मण घुमरे यांनी केली. घुमरे यांना घरे जळाल्याची माहीत मिळताच त्यांनी घाटबोरी येथे येवून जळालेल्या घराची पाहणी करून मेहकरचे तहसीलदार यांच्या सोबत चर्चा करून सदर घर मालकांना त्वरित शासनाकडुन मदत देण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी जळालेल्या घराची पाहणी केली.

त्यांच्या सोबत सोबत युनुस अली युसुफ अली, गुलाबराव दहिरे, अजमतअली युसूफअली, माजी सरपंच विष्णुपंत पाखरे, कांग्रेस तालुका अध्यक्ष देवानंद पवार, दिलीप पाटील नवले, संतोष अवसरमोल, रामभाऊ नालीदे, प्रल्हादआप्पा चुकेवर, भानुदास अजगर, सुरेश डोके, बिट्टुआप्पा चुकेवार, लक्ष्मीकांत डोंगरे, सुधीर घोडे, अकुंश राठोड, वसंता जाधव, सतिष दाहिरे, सागर दाहिरे, भारत भोकरे, विजयसिंग इतर गावकरी उपस्थित होते.