Breaking News

बर्‍हाणपुर येथे अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन


नेवासा/प्रतिनीधी
नेवासा तालुक्यातील बर्‍हाणपुर येथे सालाबादाप्रमाणे याही वर्षी अखंड हरीनाम सप्ताह व श्रीग्रंथराज ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळ्याचे मारुती मंदीर बर्‍हाणपुर येथे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दि. 9 नोव्हेंबर पासुन या सप्ताहास प्रारंभ होत असुन सांगता 16 नोव्हेंबर रोजी होणार आहे. 

पहाटे 4 ते 6 काकडा भजन, 6 ते 7 विष्णु सहस्त्र नाम, 7 ते 11 ज्ञानेश्‍वरी पारायण, सायं 5 ते 6 हरिपाठ व रात्री 8.30 ते 10.30 हरीकिर्तन ह.भ.प. गहिणीनाथ महाराज आढाव, ह.भ.प. रामेश्‍वर महाराज कंठाळे , ह.भ.प. राम महाराज , ह.भ.प. उद्धव महाराज सबलस, शिवाजी महाराज देशमुख , सुधाकर महाराज आहेर, मच्छिंद्र महाराज भोसले यांची किर्तने होतील. तर शुक्रवार दिनांक 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.30 ते 11.30 ह.भ.प. सुभाष महाराज सुर्यवंशी यांचे काल्याचे किर्तन होईल. त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम होईल. परीसरातील भाविकांनी याकार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त ग्रामस्थ व भजनीमंडळ बर्‍हाणपुर यांनी केले आहे.