सारसनगरमध्ये राष्ट्रवादीला खिंडार! माजी नगरसेवक सुरेश आंबेकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश


नगर (प्रतिनिधी) - राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक सुरेश आंबेकर यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यामुळे सारसनगरमध्ये राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. 


शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी आंबेकर यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे, शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी प्रथम महापौर भगवान फुलसौंदर, मेहुल भंडारी, संभाजी कदम, अशोक दहीफळे, सुरेश मैड, अवधुत फुलसौंदर, ऋषभ भंडारी, शैलेश गांधी, रिया सय्यद, आनंद लोखंडे, मुकेश आंबेकर, चंद्रकांत गोरे, अभिषेक भोसले, प्रसाद भोसले, प्रतिक पाटील, बाळू फुलारे व सारसनगर, अवसरकर मळा, आंबेकर मळ्याातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 

मा. बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वसामान्य लोकांच्या हक्कासाठी व त्यांना त्यांच्या न्यायासाठी या शिवसेना पक्षाची स्थापना केली. या पक्षामध्ये स्वत:च्या घरात सर्व पदे न ठेवता सर्वसामन्यांना संधी दिली जाते. मात्र काही शिवसैनिकांना, असे वाटते की सर्व काही मलाच भेटले पाहिजे, अशा स्वार्थी लोकांना अनेक संधी देऊनही त्यांचे मन भरत नाही, मग ते या पक्षाशी गद्दारी करुन दुस-या पक्षामध्ये जातात, असे मत शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी व्यक्त केले. 

सारसनगर परिसरात गेल्या अनेक वर्षापासून बिनविरोध निवडणुका होत होत्या आणि कुठल्याही स्थानिक कार्यकर्त्याला संधी दिली जात नव्हती. घराणेशाहीलाच पुढे ढकलण्याचे काम सातत्याने होत होते. पण आता या भागातील नागरिकांना याचा कंटाळा आला असून स्वत:चे कार्य जनतेसमोर आणण्यासाठी एकमेव शिवसेना पक्ष आहे, असे वाटत आहे आणि या पक्षामध्ये सर्वसामान्यांना मोठा मान मिळतो आणि न्यायही मिळतो. यामुळे शिवसेनेत लोकांची संख्या कायम वाढतच असते, असे मत जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांनी व्यक्त केले. 

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget