चांगला सराव व खेळात सातत्य ठेऊन नावलौकिक वाढवा- सानंदा


खामगाव,(प्रतिनिधी): कबड्डी हा मैदानी आणि मर्दानी खेळ असून हा खेळ जिवंत ठेवण्यासाठी सातत्याने स्पर्धेचे आयोजन करणे ही काळाची गरज बनली आहे. कबड्डी खेळाच्या माध्यमातून खेळाडूंनी सांघीक खेळाचे कौशल्य दाखवावे. नेहमी चांगला सराव व खेळात सातत्य कायम ठेवून विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन आपला आत्मविश्‍वास अधिक दृढ करावा असे आवाहन माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी केले.

 खामगांव तालुक्यातील श्रीधर नगर येथे महाराणा कबड्डी संघाच्या वतीने ग्रामीण भागातील खेळाडूंकरीता 3 दिवसीय कबड्डीचा महासंग्राम आयोजीत करण्यात आला होता यामध्ये विजेत्या संघांना 70 हजार रुपयांची जंगी लुट करण्यात आली. 1 नोव्हेंबर रोजी या सामन्यांचे उद्घाटन माजी आमदार सानंदा यांच्या हस्ते पार पडले. यावेळी विदर्भ कबड्डी असो. चे अध्यक्ष अशोक देशमुख, सोसायटी अध्यक्ष विलासभाऊ इंगळे, महावीर थानवी, शहर कार्याध्यक्ष अशोक मुळे, राजु पाटील, ज़गदीश इंगळे वर्णा, गेरु माटरगांवचे सरपंच भागचंद मछले, चंदरसिंग पडवाळ, मनोहर पाटील, तुषार चंदेल आदींची प्रमुख उपस्थिती होती. सर्वप्रथम आयोजकांच्या वतीने पकुमार सानंदा व मान्यवरांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी कबड्डी खेळाडूंचा परिचय करुन घेतला व नाणे फेक करुन सामन्याला सुरुवात करण्यात आली. पहिला सामना महाराणा कबड्डी संघ श्रीधर नगर विरुध्द माँ जय दुर्गा गेरु माटरगांव या संघादरम्यान खेळला गेला. या स्पर्धेमध्ये एकूण 55 कबड्डी संघांनी सहभाग घेतला. 3 नोव्हेंबर रोजी रामसिंग राजपूत यांच्या हस्ते स्पर्धेचे बक्षिस वितरण पार पडले यावेळी सरपंच भागचंद मछले, ग्रा. पं. उपसरपंच शे. अफसर, सदस्य सर्वश्री दामोदर हेलोडे, हरसिंग साबळे, प्रेमसिंग चव्हाण, भगवानदास साबळे, पुैलसिंग चव्हाण, रमेश खोडके, ग्रा. पं. शिपाई किसन चव्हाण यांची उपस्थिती लाभली होती. या सामन्यांमध्ये प्रथम बक्षिस 31,001 रुपयांचे माजी आमदार सानंदा यांच्या वतीने राणा कबड्डी संघ वर्णा, द्वितीय बक्षिस 21,001 रुपयांचे रामासिंगभाऊ राजपूत यांच्यातर्फे योगी कबड्डी संघ उमाळी ता. मलकापूर, तृतीय बक्षिस 11,001 रुपयांचे भागचंद मछले सरपंच माटरगांव यांच्या तर्फे चक्रधर स्वामी कबड्डी संघ धानोरी ता. मेहकर, चतुर्थ बक्षिस 7001 रुपयांचे ग्राम पंचायत सदस्य श्रीधर नगर यांच्या तर्पेै जय संतोषी माँ कबड्डी संघ जानेफळ यांनी पटकाविले. तर अंतीम सामन्यातील सुपर हेड, बेस्ट डिपेैन्डर, सुपर रेड, प्रथम पॉईंट, मुमेंट ऑफ द मॅच इत्यादी खेळाडूंना दामोदर हेलोडे, नरसिंग चव्हाण, संजय भेलके, पिंटुभाऊ साईराम हॉटेल उन्द्री, माणिकराव इंगळे, विजय मोहिते ड्रायव्हर सारोळा यांच्या वतीने प्रत्येकी 501 रुपयांचे व भगवान डांगरे यांचेकडून दिवाल घडी प्रोत्साहन पर बक्षिसे देण्यात आली.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget