अमित शहांना हायकोर्टाचा मोठा दिलासा


सोहराबुद्दीन शेख एन्काऊंटर प्रकरणात हायकोर्टात अपील न करण्याचा सीबीआयचा निर्णय कोर्टाने योग्य ठरवला आहे. त्यामुळे भाजप अध्यक्ष अमित शहा यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

अमित शहांना सोहराबुद्दीन शेख एन्काऊंटर प्रकरणात सीबीआय कोर्टाने दोषमुक्त ठरवलं होतं. सीबीआयकडून मिळालेल्या या दोषमुक्तीच्या निर्णयास बॉम्बे लॉयर्स असोसिएशननं हायकोर्टात आव्हान दिलं होतं. बॉम्बे लॉयर्स असोसिएशनची ही याचिका आता हायकोर्टानं फेटाळली आहे.

याचिकाकर्त्यांचा या केसशी थेट संबंध प्रस्थापित होत नसल्याचं म्हणत हायकोर्टाने ही याचिका फेटाळली आहे. दरम्यान, हायकोर्टाच्या या निर्णयाला आपण सुप्रीम कोर्टात आव्हान देणार असल्याचं आता बॉम्बे लॉयर्स असोसिएशनकडून सांगण्यात आलं आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget