Breaking News

लोकांनी आम्हाला कामातून स्वीकारले -डॉ विखे; हितचिंतकांची टिका निरर्थक!


कर्जत/प्रतिनिधी
पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या माध्यमातून वर्षानुवर्षे या भागाशी माणसांशी जोडल्या गेलेल्या संबंधातून आणि कामातून जनतेने आम्हाला स्वीकारले आहे. त्यामुळे, लादलेल्या नेतृत्वाची टिका कोणी करीत असेल तर त्याला आपण फार महत्व द्यायचे नाही. असे स्पष्ट प्रतिपादन पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे फोंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुजय विखे पाटील यांनी केले.

तालुक्यातील महीजळगाव येथे जनसेवा फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या आरोग्य शिबीराचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात विखे पाटील यांनी स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधून आरोग्य शिबिराच्या आयोजना मागील भूमिका स्पष्ट केली. या शिबीराचा राजकीय भूमिकेतून आपण उपयोग कधीही केला नाही असेही त्यांनी सांगितले.

राजकारणात सर्वात चांगले शिक्षण घेतलेला मी तरूण आहे. त्यामुळे लोकांची दुःख मला चांगली समजतात. आज कोणत्याही शारीरिक आजारासाठी मोठा खर्च येतो. सामान्य माणूस हा खर्च करू शकत नाही. आशा माणसांना प्राथमिक तपासणीतून मार्गदर्शन व्हावे, पुढील उपचारासाठी दिशा मिळावी हा सामाजिक दृष्टीकोन माझा आहे. पण आमचे राजकीय हितचिंतक या उपक्रमाकडे राजकीय हेतूने पाहात असतील तर दुर्दैव असल्याची खंत व्यक्त करून डॉ. विखे पुढे म्हणाले की, यापुर्वी आमच्या परिवाराला लोकांनी कामाच्या माध्यमातून स्वीकारले आहे. वर्षानुवर्षे या भागातील माणसांशी संबंध आहे तरीही आम्ही बाहेरचे आणि लादलेले कसे होवू शकतो असा प्रश्‍न उपस्थित करून, कोणाला काय चर्चा करायच्या त्या त्यांनी खुशाल कराव्यात बोलायला पैसे लागत नाहीत स्वतः काही करायचे नाही. दुसरे करतात ते यांना पाहावत नाही. आशा शब्दात त्यांनी टीकेचा समाचार घेतला.