राज्यस्तर शालेय वेटलिफ्टींग स्पर्धेत कोल्हापूर व नाशिक विभागाचे वर्चस्व


बुलडाणा,(प्रतिनिधी): 1 नोव्हेंबर रोजी झालेल्या स्पर्धेतील प्राविण्य प्राप्त खेळाडूंचे कौतुक व अभिनंदन आमदार चैनसुख संचेती मलकापूर विधानसभा मतदार संघ, डॉ.सुकेशजी झंवर चिफ मॅनेजिंग डायरेक्टर बुलडाणा अर्बन परिवार तसेच प्रमोदसिंग दुबे अप्पर जिल्हाधिकारी बुलडाणा यांचे हस्ते करण्यात येऊन खेळाडूंना त्यांच्या वजनगटनिहाय, मेडल्स् प्रदान करण्यात आले.

आमदार चैनसुख संचेती यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करतांना आपल्या नेहमीच्या खुमासदार शैलीत शेरोशायरी करत उपस्थित खेळाडूंचे व क्रीडा प्रेमींचे मन जिंकले. सतत सराव व मेहनतीने खेळाडूंना निश्‍चीत यश प्राप्ती होते. तर खेळाडूंनी उत्कृष्ठ खेळाचे प्रदर्शन करुन, आपल्या राज्याचे व देशाचे नावलौकीक करावे. तर शासन नेहमीच क्रीडा क्षेत्राच्या पाठीशी उभे आहे असेही त्यांनी सांगीतले. 17 वर्ष मुली 81 किलो वजनगटात प्रथम क्रमांक मुंबई विभागाचा सानिध्य संजय मोरे, द्वितीय क्रमांक नागपूर विभागाचा अभिजित बबलु सोनटक्के तर तृतीय क्रमांकाचा पुणे विभागाचा अंकीत जयसिंग यादव यांना अनुक्रमे सुवर्ण पदक, रजत पदक व कांस्य पदक प्रदान करण्यात आले. 19 वर्ष मुले 81 किलो वजनगटात प्रथम क्रमांक कोल्हापूर विभागाचा अब्दुल फैझुल सय्यद, द्वितीय क्रमांक अमरावती विभागाचा विजय चंदु निवाणे, तर तृतीय क्रमांक नाशिक विभागाचा तेजस रमेश रणशिंगे यांनी प्राप्त केल्यानुसार त्यांना अनुक्रमे सुवर्ण पदक, रजत पदक व कांस्य पदक प्रदान करण्यात आले. 19 वर्ष मुली 59 किलो वजनगटात प्रथम क्रमांक कोल्हापूर तृप्ती संजय माने, द्वितीय क्रमांक नाशिक विभागाची पुजा मनसुब कुनगर तर तृतीय क्रमांक मुंबई विभागाची करीष्मा मारुती कोकरे यांनी प्राप्त केल्यानुसार, त्यांना अनुक्रमे सुवर्ण पदक, रजत पदक व कांस्य पदक प्रदान करण्यात आले. 17 वर्ष मुली 59 किलो वजनगटात प्रथम क्रमांक कोल्हापूर विभागाची सोनाली केशरी गायकवाड, द्वितीय क्रमांक नाशिक विभागाची धनश्री विनोद बेदाडे तर तृतीय क्रमांक लातुर सुप्रिया सुभाष चौरे यांनी प्राप्त केल्यानुसार, त्यांना अनुक्रमे सुवर्ण पदक, रजत पदक व कांस्य पदक प्रदान करण्यात आले. 19 वर्ष मुली 55 किलो वजनगटात प्रथम क्रमांक नाशिक विभागाची धनश्री नितीन पवार, द्वितीय क्रमांक औरंगाबाद विभागाची ऋतिका चंद्रकांत कांबळे तर तृतीय क्रमांक कोल्हापूर भाग्यश्री संजय मिठारे यांनी प्राप्त केल्यानुसार, त्यांना अनुक्रमे सुवर्ण पदक, रजत पदक व कांस्य पदक प्रदान करण्यात आले. या स्पर्धा यशस्वी होण्याकरीता मा.डॉ.निरुपमा डांगे जिल्हाधिकारी बुलडाणा यांचे मार्गदर्शनाखाली शेखर पाटील जिल्हा क्रीडा अधिकारी, घनश्याम राठी तालुका क्रीडा अधिकारी, घनश्याम वरारकर क्रीडा अधिकारी, भाऊसाहेब जाधव क्रीडा अधिकारी, महेश खर्डेकर राज्य क्रीडा मार्गदर्शक, अनिल इंगळे राज्य क्रीडा मार्गदर्शक, विजय बोदडे वरिष्ठ लिपीक, सुरेशचंद्र मोरे व्यवस्थापक, विनोद गायकवाड, कैलास डुडवा, कृष्णा नरोटे, भिमराव पवार, गणेश डोंगरदिवे, कैलास करवंदे, एन.बी.धंदर, अविनाश घुगे, रवि भगत, संजय चितळे, गणेश जाधव हे हे अथक परिश्रम घेत आहेत तर लोडर म्हणून निलेश शिरकरे, कुणाल नारखेडे, विकास सोखंडे, अजय आसलकर, अजय शिंगणे, ऋषभ क्षिरसागर, प्रणव संजय गिते हे उत्कृष्ठ काम करत आहेत असे श्री.शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी, बुलडाणा हे कळवितात.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget