बोंड अळीच्या अनुदानासाठी स्वाभिमानीचे शोले आंदोलन प्रशासकिय इमारतीच्या गच्चीवर दोन तास ठिय्या


खामगाव,(प्रतिनिधी)ः खामगाव तालुक्यातील बोंड अळीच्या तिसर्‍या टप्प्याचे अनुदान अद्याप शेतकर्‍यांना मिळाले नाहीत. त्यामुळे शेतकर्‍यांची दिवाळी अंधारात जाईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकार ने तात्काळ पाऊल उचलून शेतकर्‍यांना बोन्ड अळीचे अनुदान द्यावे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने खामगाव उपविभागीय कार्यालयावर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. दिवाळी आधी अनुदान मिळालं नाही तर दिवाळी उपविभागीय कार्यलयावरच साजरु करू असा इशारा सुद्धा या वेळी त्यांनी दिला आहे. 

यावर्षी दुष्काळामुळे शेतकर्‍याच्या घरात अंधार राहण्यार असल्याने दिसून येत आहे.सतत च्या नापिकी मुळे घरात पैसा नाही आतापर्यंत कधीच न पाहिलेला दुष्काळाचे तुकडे या सरकारने केले आहे.दिवाळी हा वर्षातील सर्वात मोठा सण येत्या पाच दिवसावर येऊन ठेपला आहे तरी बोड अळी चे अनुदान शेतकर्‍याला मिळाले नाही. गेल्या 4 वर्षी पासून सोयाबीनचे 200 रुपये अनुदानही अद्याप मिळाले नाही.कर्ज माफीच्या यादीमध्ये नाव असून सुद्धा कर्ज माफ झाले नाही. दुष्काळाची झळा सोसत असलेला शेतकरी अद्यापही बोण्ड अळीच्या अनुदान पासून वंचित आहे त्यामुळे स्वाभिमानी ने अनुदान मिळण्यासाठी आक्रमक पवित्र घेऊन खामगाव येथील उपविभागीय कार्यालय वर चढून’शोले’ आंदोलन केले.यावेळी जिल्हाध्यक्ष कैलास फाटे, तालुका अध्यक्ष राजू नाकाळे, श्रीकृष्ण काकडे, प्रकाश पाटील, गजानन पटोकार, रोहन देशमुख, सोपान खंडारे,संजय बोचरे,अमीर शाहा ,चंदू राहणे रमेश यादगिरे यांच्यासह कार्यकते आंदोलनात सहभागी झाले होते. दिवाळीच्या आधी शेतकर्‍यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा होईल असे आश्‍वासन उपविभागीय अधिकारी कार्यलयाच्या वतीने देण्यात आल्याने सदरहू आंदोलन स्थगित करण्यात आले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget