Breaking News

ऑनलाईन अपहरणातील रक्कम तीन तासांत मिळाली परतनगर । प्रतिनिधी -
फोनद्वारे क्रेडिट कार्डचा नंबर विचारुन ऑनलाईन अपहार केल्याच्या प्रकरणाचा येथील सायबर पोलिस ठाण्याने अवघ्या तीन तासांत छडा लावत तक्रारदाराची अपहार झालेली रक्कम मिळवून दिली आहे.
महादेव नामदेव ससे यांच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तीने फोन करुन क्रेडिट कार्ड नंबर तसेच ओपीटी, सीव्हीव्ही क्रमांक विचारुन बँक खात्यातून 87 हजार 498 रुपये ऑनलाईन काढले होते. याप्रकरणी महादेव ससे यांनी येथील सायबर पोलिस ठाण्यात मंगळवारी (दि. 27) तक्रार दिली होती.

त्यानुसार पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अप्पर अधीक्षक जयंती मीना, उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम, उपनिरीक्षक पी. डी. कोळी, हेडकॉन्स्टेबल बेरड, उमेश खेडकर, पोलिस नाईक विशाल अमृते, राहुल हुसळे, स्मिता भागवत, कॉन्स्टेबल अरुण सांगळे, प्रशांत राठोड, राहुल गुंडू, दीपाली घोडके यांनी तांत्रिक तपासणी करुन अवघ्या तीन तासांत ससे यांची अपहार झालेली रक्कम परत मिळवून दिली.

दरम्यान, कोणतीही बँक फोन करुन एटीएम किंवा क्रेडिट कार्डची माहिती विचारत नाही. याबाबत विचारणा केल्यास कोणत्याही प्रकारची माहिती देऊ नये. ऑनलाईन फसवणूक झाल्यास नागरिकांनी तात्काळ सायबर पोलिस ठाण्याचे संपर्क साधण्याचे आवाहन पीआय बाळकृष्ण कदम यांनी केले आहे.