मुंबादेवी दुध संस्था हिवरे बाजारचे बोनस वाटप


नगर/प्रतिनिधी
आदर्श गाव हिवरे बाजार येथील मुंबादेवी सहकारी दुध उत्पादक संस्थेचे नुकतेच बोनस वाटप झाले. संस्थेला झालेल्या नफ्यातून सालाबादप्रमाणे 50 पैसे प्रतिलिटर प्रमाणे सभासदांना कन्हैया उद्योग समूहाचे चेअरमन मा. मच्छिंद्र लंके व मा. गणेश पोटे आयुक्त वस्तू व सेवा कर (ॠडढ) औरंगाबाद विभाग यांच्या हस्ते तसेच उद्दोजक सुरेश पठारे , उद्दोजक रंगनाथ रोहकले, उद्दोजक बबलू शेठ रोहकले यांच्या उपस्थितित वाटप करण्यात आले .कार्यक्रमास मुंबादेवी सहकारी दुध उत्पादक संस्थेचे चेअरमन तथा आदर्शगाव गाव योजनेचे कार्याध्यक्ष मा.पोपटराव पवार व व्हा.चेअरमन बाबासाहेब गुंजाळ, विठ्ठल ठाणगे उपस्थित होते. संस्थेचे सभासद श्री. भानुदास माधव बांगर यांनी वर्षभरात 52360 लिटर दुध घातले असून त्यांना 26180 रुपये बोनस मिळाला तसेच श्री भानुदास धनराज पादीर यांना 24800 रुपये बोनस मिळाला व रघुनाथ रंगनाथ बांगर यांना 21900 बोनस मिळाला अनुक्रमे एक दोन तीन क्रमांकाचा बोनस वरील सभासदांना मिळाला असून बाकी सर्व सभासदांना त्यांनी वर्षभर घातलेल्या दुधाच्या प्रमाणात बोनस मिळाला .एकूण संस्थेचे 101 सभासद असून रक्कम 426329 रुपये एकूण बोनस वाटण्यात आला कार्यक्रमासाठी संस्थेचे दुध उत्पादक सभासद मोठ्या संखेने हजर होते .

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget