कारंजा ते अजीजपुरा रस्त्याची अत्यंत दर्दशा


बीड, (प्रतिनिधी) : कारंजा मार्गे अजीजपुरा, रस्ता गंभीर दुर्दशा झालेली आहे. रस्त्यावर मोेठे-मोठे खड्डे पडलेले आहेत. रस्त्यावर चालतांना लोकांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे लोकांना पाठीचे आजार होत आहे. रस्ता अत्यंत खराब झाल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धुराळा होत आहे.त्यामुळे या भागातील नागरिकांना श्‍वसनाचे रोग व श्‍वसनाचा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावर दोन शाळा, दोन मस्जिद आहेत. नळाला पाणी आल्यावर नाली गटारीचे पाणी रस्त्यावरच्या मोठ मोठ्या खड्ड्यामध्ये तुडूंब भरत आहेत. त्यामुळे शाळकरी मुलांना व नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तरी सदरील रस्ता दुरुस्ती करण्यात यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सय्यद फरहान स.शराफत, शेख शाकेरभाई, अदील इनामदार, अब्दुल जब्बार टेलर, अ.अझहर इनामदार, शेख मुबीन, शेख इम्रान यासह आदी भागातील नागरिकांनी केली आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget