शुक्रवारी संगमनेरात रंगणार दिवाळी पहाट गाणी


संगमनेर/प्रतिनिधी 
शहराच्या सांस्कृतिक क्षेत्रात मानाचे स्थान असलेला संगमनेर दिवाळी पहाट गाणी हा कार्यक्रम शुक्रवारी दि.9 पहाटे साडेपाच वाजता भंडारी मंगल कार्यालयात होणार असल्याची माहिती कार्यक्रमाच्या निमंत्रक कांचनताई थोरात, धनश्री सोमाणी व शरयुताई देशमुख यांनी दिली आहे. दिवाळी पहाट गाण्यांचे हे बारावे वर्ष आहे. संगमनेर इतिहास संशोधन मंडळ, स्वरसंगम संगीत प्रसारक संस्था व शहरातील नागरिकांच्या वतीने आयोजित पहाट गाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

या कार्यक्रमाला मा.महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,आ. डॉ.सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, रणजितसिंह देशमुख, कैलास सोमाणी आदि मान्यवर उपस्थित राहणार आहे. हे वर्ष आधुनिक वाल्मिकी म्हणून ओळखले जाणारे महान गीतकार ग.दि.माडगुळकर,ज्येष्ठ संगीतकार बाबूजी उर्फ सुधीर फडके, महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु.ल.देशपांडे, संगीतकार राम कदम,गीतकार कमर जलालाबादी या महान कलाकारांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने त्यांची गाणी आणि आठवणी जागविल्या जाणार आहेत. मागील वर्षात दिवंगत झालेले संगमनेरातील दिवाळी गाण्याचे जनक प्रेमानंद रुपवते व शहराच्या सांस्कृतिक क्षेत्रातील लोकप्रिय व्यक्तिमत्व प्रकाश बर्डे यांनाही या कार्यक्रमातून आदरांजली अर्पण केली जाणार आहे.


Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget